आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉंग्रेस-राष्‍ट्रवादीने महाराष्‍ट्राला बकाल केले, आदित्य ठाकरे यांचे प्रति‍पादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड - गेल्या पंधरा वर्षांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीने केंद्रासह महाराष्ट्रालाही बकाल केले असून रस्ता, वीज, सिंचन अशा क्षेत्रांत राज्य पिछाडीवर आहे. सत्ताधा-यांनी सामान्य जनतेच्या खिशातून पैसा काढून पाकीटमाराचे काम केले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा- विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचीच सत्ता केंद्रात व महाराष्ट्रात येणार असल्याचे प्रतिपादन युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले.
कन्नड येथे आयोजित युवा संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. गिरणी ग्राउंडवर आयोजित सभेत ते पुढे म्हणाले की, सध्याचे मुख्यमंत्री जनतेचे नसून सोनिया गांधींचे आहेत. जनतेसाठी जनतेत मिसळणारा, जनतेची कामे करणारा मुख्यमंत्री असणे गरजेचे आहे. नऊ वर्षे मराठवाड्याचे मुख्यमंत्री असतानाही मराठवाड्याचा विकास झालेला नाही. युवकांना शिक्षण पूर्ण करूनही नोकरी मिळत नाही. त्यामुळे ही परिस्थिती बदलायची असेल तर युतीची सत्ता येणे आवश्यक आहे, असे ठाकरे म्हणाले.
ज्या राज्यात आमदारास मारहाण होते, तेथे सामान्य जनतेचे काय हाल असतील याचा विचार न
केलेलाच बरा, असाही टोला त्यांनी लगावला.
सत्ता आल्यास कारखाना परत घेऊ-युतीची सत्ता आल्यानंतर विक्री झालेला कन्नड साखर कारखानाही ताब्यात घेऊ तसेच पिशोर येथील हिराजी महाराज कारखाना सुरू करू, असे ठाकरे यांनी सांगितले.
कृषिआधारित उद्योगांना चालना द्यावी- जाधव
०या वेळी आमदार हर्षवर्धन म्हणाले की, कृषीवर आधारित उद्योगाला चालना मिळाली तरच तालुक्याचा विकास होईल, तसेच खासदार खैरे यांना लोकसभेसाठी तालुक्यातून 80 हजारांचे मताधिक्य मिळवून देऊ.
० दरम्यान, आदित्य ठाकरे यांची भेट न झाल्यामुळे युवा सेनेच्या नाराज कार्यकर्त्यांनी स्वत:च लावलेल्या बॅनरची तोडफोड केली.
० या सभेसाठी माजी आमदार नामदेवराव पवार हजर राहतील की नाही याची चर्चा होती. अखेर ते हजर राहिलेच नाहीत.
० सभेसाठी तालुकाप्रमुख अण्णा शिंदे, शिवाजी थेटे, शहरप्रमुख राम पवार, अवचित वळवळे, दिलीप मुठ्ठे, जयेश बोरसे, सिद्धार्थ निकाळजे आदींची उपस्थिती होती.