आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाडीत आमदार काळे यांचा खोडा : सोनवणे

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री - फुलंब्री विधानसभांतर्गत येणाºया 8 जिल्हा परिषद गटांत आघाडी करावी, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे मत आहे. मात्र, यात आमदार कल्याण काळे आडकाठी आणत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे यांनी केला.
येथे पत्रकार परिषदेत सोनवणे बोलत होते. ते म्हणाले, आम्ही आघाडीबाबत आमदार काळे यांच्याशी बोलणी करण्याचा प्रयत्न केला. विधानसभेत फुलंब्री तालुक्यात 4 व औरंगाबाद तालुक्यात 8 जागांपैकी आम्ही काँग्रेसला वडोदबाजारसह 5 जागा काँग्रेसला देण्यास तयार असताना आमदारच याबाबत बोलायला तयार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस आजही फुलंब्री विधानसभेत काँग्रेससोबत आघाडी करण्यास तयार आहे. मात्र, आमदार काळे आघाडी करण्यास उत्सुक नसल्याचे यावरून दिसते, असेही सोनवणे म्हणाले.