आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचाराचा धडाका आजपासून, धुराडा आणखी वाढवणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी झाल्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीच्या प्रचाराला बुधवारपासून सुरुवात होत आहे. दोन्हीही पक्षांचे मंत्री, नेते हे उद्यापासून शहरात दाखल होण्यास सुरुवात होणार आहे. दोन्हीही पक्षांचे प्रदेशाध्यक्षही शहरात थांबून प्रचाराचा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण शुक्रवारी शहरात येत आहेत, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेही शहरात सभा घेतील. काँग्रेसकडून विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, बाळासाहेब थोरात, नसीम सिद्दिकी, आमदार प्रणिती शिंदे ही मंडळी शहरात दाखल होत आहेत, तर राष्ट्रवादीकडून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, समीर भुजबळ, हसन मुश्रीफ, राजेश टोपे हे नेते प्रचार करणार आहेत. दरम्यान, काँग्रेसकडून नेमके किती नेते प्रचाराला येतील हे अजून नक्की झालेले नसले तरी स्वत: प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण हेच नियोजन करत असल्यामुळे जाहीर प्रचारापेक्षा नियोजनाला त्यांनी जास्त प्राधान्य दिले आहे.

मुस्लिमहुल भाग प्राधान्य
काँग्रेसपाठोपाठराष्ट्रवादीनेही आपला जोर मुस्लिमबहुल भागात लावल्याचे बोलले जाते युतीची ताकद असलेल्या ठिकाणी जोर लावला तरी फारसे नगरसेवक निवडून येणार नाहीत याची कल्पना असल्याने दोन्हीही पक्षांच्या स्थानिक नेत्यांनी एमआयएममध्ये सुरू असलेल्या भांडणाचा लाभ घेण्याचे ठरवले आहे. काँग्रेसने ही जबाबदारी माजी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर सोपवली आहे. राष्ट्रवादीनेही कार्यकर्त्यांना कामाला लावले आहे. त्यामुळे बुधवारपासून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू होणार हे नक्की आहे.

युतीच्या बंडखोरांवर नजर
शिवसेना-भाजपचीयुती झाली असली तरी २१ वाॅर्डांत बंडखोरी झाली आहे. अशा वाॅर्डांत मतविभाजनाचा फायदा घेण्यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू असून तेथे विशेष लक्ष ठेवले जात असल्याचे समजते. युती बंडखोरांना मिळणाऱ्या मतांपेक्षा थोडीशी मते जास्त मिळाली तर सीट लागू शकते, त्यामुळे काही वाॅर्डांवर निरीक्षकांकडून विशेष मेहनत घेतली जात आहे.