आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress & Ncp Problem At Vaijapur Dist Aurangabad

वैजापूर तालुक्यात जागावापटपावरून आघाडी अडचणीत

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर: तालुक्यातील जिल्हा परिषद गटातील 4 जागा आणि पंचायत समिती गणातील 6 जागा अशा एकूण 12 जागा राष्ट्रवादीला हव्या आहेत. जागावाटपात काँग्रेसने जर राष्ट्रवादीला 12 जागा दिल्या नाही, तर आघाडीशी काडीमोड करून राष्ट्रवादी येथील 21 जागा स्वबळावर पूर्ण ताकदीने स्वतंत्रपणे लढवणार असल्याची माहिती 20 जानेवारी रोजी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष भाऊसाहेब चिकटगावकर यांनी दिली. राष्ट्रवादीने जागावाटपाच्या घेतलेल्या भूमिकेमुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीची नाळ जवळपास तुटण्याच्या मार्गावर आहे.
आज दुपारी धुमाळ मंगल कार्यालयात राष्ट्रवादीचे भाऊसाहेब चिकटगावकर यांनी उपनगराध्यक्ष मजीद कुरेशी, तालुकाध्यक्ष प्रमोद नांगरे, माजी सभापती प्रताप धोर्डे, माजी तालुकाध्यक्ष विजय पवार, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रभाकर बारसे, माजी नगरसेवक गोविंद धुमाळ, रामदास टेके आदी प्रमुख पदाधिकार्‍यांशी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषद घेतली.
या वेळी पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादीचे भाऊसाहेब चिकटगावर यांनी सांगितले की, नगरपालिका निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीने 15 जागा देऊन आम्ही आघाडीच्या माध्यमातून 6 जागा मिळवत सत्ता काबीज केली. तथापि नगरपालिकेत आघाडी करताना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादीला अधिक जागा देण्याचा शब्द काँग्रेसच्या नेत्यांनी बोलणीत दिला होता. त्यानुसार राष्ट्रवादीने तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या एकूण 21 जागांपैकी 4 जिल्हा परिषद गटासाठी व 8 पंचायत समिती गणासाठी मागितल्या आहेत.
हा प्रस्ताव काँग्रेसला देण्यात आला आहे. तथापि काँग्रेसमधील काही नेतेमंडळींना हा प्रस्ताव मान्य नाही. काँग्रेसने आमचा प्रस्ताव मान्य केला नाही, तर राष्ट्रवादी तालुक्यातील 21 जागा स्वतंत्रपणे लढवणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
चिकटगावकर बंधूंत दिलजमाई
राष्ट्रवादीला आघाडीच्या जागावाटपात 4 जिल्हा परिषदेचे गट द्यावे म्हणून काँग्रेसचे नेते माजी आमदार कैलास चिकटगावकर यांनी संमती देण्याची भूमिका घेतली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही चिकटगावकर बंधूंमध्ये औरगाबादला अनेक वर्षांनंतर चर्चा घडून आली. स्वत: भाऊसाहेब चिकटगावकर यांनी कैलास चिकटगावकर यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगितले.
राष्ट्रवादीने केली काँग्रेसची कोंडी
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जागावाटपाचे घोडे लासूरगाव या जिल्हा परिषद गटावरून अडकले आहे. माजी खासदार रामकृष्णबाबा पाटील यांच्या नातवाला या गटातून काँग्रेस उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे. तथापि गेल्या विधानसभा निवडणुकीत भाऊसाहेब चिकटगावकर यांना या गटातून मतांची मोठी आघाडी मिळाली असल्याने त्यांनी हा खुल्या प्रवर्गातला गट राष्ट्रवादीला सोडावा, अशी भूमिका घेतली आहे.
माजी खासदार रामकृष्ण पाटील यांचे कट्टर विरोधक असलेले काँग्रेसचे नेते माजी आमदार कैलास चिकटगावकर यांनीही हा गट राष्ट्रवादीला सोडण्यास संमती दिल्यामुळे काँग्रेसमधील इतर नेत्यांची कोंडी झाली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते डॉ. दिनेश परदेशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आघाडीतील जागावाटपाविषयी राष्ट्रवादीशी बोलणे सुरू आहे. 23 जानेवारी रोजी आघाडीचे अंतिम स्वरूप स्पष्ट होईल.