आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस पक्षाची स्वबळावर लढण्याची तयारी पूर्ण ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी करणार की स्वबळावर लढणार, याविषयी दोन -तीन दिवसांपासून काँग्रेस पक्षांतर्गतच कार्यकर्त्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. काँग्रेसने स्वबळावर लढावे यासाठी नाराज कार्यकर्त्यांनी आंदोलनदेखील केले होते. या भावना प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यापर्यंत शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम यांनी पोहोचवल्या असून काँग्रेस स्वबळावर लढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राष्ट्रवादीपासून मुस्लिम मतदार दूर गेला असून शहरातील राष्ट्रवादीची लोकप्रियता घटली असल्याचा कयास काँग्रेसच्या नेतेमंडळींनी बांधला आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत राष्ट्रवादीसोबत आघाडी नको, अशी चर्चा सुरू होती. एमआयएममधील अंतर्गत गटबाजी आणि राष्ट्रवादीची घटलेली ताकद याचा फायदा काँग्रेस पक्षालाच होईल, असा दावा स्थानिक नेत्यांनी केला आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेसचे स्थानिक शिष्टमंडळ प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे गेले होते. या वेळी काँग्रेस नेत्यांनी स्वबळावरच लढण्याचा निश्चय केला असल्याचे पक्षातील नेत्यांच्या हालचालीवरून दिसून येत आहे. त्यासाठी काँग्रेसच्या वतीने सर्व वॉर्डातील उमेदवारांची चाचपणी झाली आहे.

स्थानिक नेत्यांवर जबाबदारी
काँग्रेस पक्षात आघाडीबाबत अद्याप अंतर्गत चर्चा सुरू आहे. राष्ट्रीवादीसोबत आघाडीबाबत स्थानिक नेत्यांवर जबाबदारी सोडलेली आहे. यामुळे अजून आघाडीचा काहीही विचार झाला नाही. सचिन सावंत, प्रदेश प्रवक्ते, काँग्रेस

या कार्यर्त्यांच्या भावना
आमची ११३ वॉर्डांमध्ये लढण्याची संपूर्ण तयारी आहे. राष्ट्रवादीला सोबत घेऊ नये, अशा कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. त्यामुळे त्या भावना मी पक्षाचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे सोपवल्या आहेत. ते जे निर्णय घेतात ते मान्य करू.
अॅड. सय्यद अक्रम, शहराध्यक्ष, काँग्रेस