आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Planning For 2014parlimant Election Aurangabad

प्रतिमा बदलण्याचा मुख्यमंत्र्यांचा प्रयत्न

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - कार्यकर्त्यांना न भेटता बंद दालनात चर्चा करणे, श्रेष्ठी म्हणतील तेच म्हणत भेटीस आलेल्यांना पिटाळत लावणे, निर्णय न घेणे अशी निर्माण झालेली प्रतिमा पुसून थेट जनमानसात जाणारा मुख्यमंत्री म्हणून आगामी निवडणुकीत सामोरे जाण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण सज्ज होत असल्याची काँग्रेस-राष्ट्रवादी आणि विरोधकांमध्येही चर्चा आहेत. प्रतिमा बदलण्याच एक भाग म्हणून चव्हाणांनी जनजागरण यात्रा सुरू केली असून त्याचा शुभारंभ शनिवारी (27 सप्टेंबर) जिल्ह्यातील वैजापूर येथून होत आहे. त्यानंतर सायंकाळी चव्हाण भोकरदन येथेही सभा घेणार आहेत.

एकाच पंधरवड्यात दुसर्‍यांदा औरंगाबाद जिल्ह्यात जाहीर कार्यक्रमासाठी येण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे. काँग्रेसकडे जनाधार असलेला नेता नसल्याने माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना मैदानात आणा, अशी मागणी काँग्रेसच्या जिल्हा कमिटीने करण्याच्या पाश्र्वभूमीवर दुसर्‍या चव्हाणांची ही भूमिका अशोकरावांना दूर ठेवण्यासाठीच असल्याचीही चर्चा काँग्रेस वर्तुळात सुरू आहे. असे असले तरी किमान मराठवाड्यात अशोकरावच हवेत यावर काँग्रेसजन ठाम आहेत.

दिल्लीतील प्रदीर्घ वास्तव्य आणि थेट 10 जनपथचा पाठिंबा असल्यामुळे पृथ्वीराज यांना कधीच जनाधाराची गरज भासली नाही. त्यांची इच्छा नसताना ते मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. त्यानंतरही त्यांना कार्यकर्ते पाठीशी असावेत, असे वाटले नाही. कारण काही महिन्यांतच पुन्हा दिल्लीच्या थंडीत दाखल होण्याची घाई त्यांना झाली होती. मात्र, राज्यातील बदलती राजकीय समीकरणे आणि जनमानसावर पगडा असणार्‍या नेत्यांच्या अभावामुळे पृथ्वीराज यांनाच मुंबईचे तख्त सांभाळावे लागले. आता निवडणुका तोंडावर आल्या असून या परिस्थितीत मुख्यमंत्री बदलला जाणार नाही, हेही स्पष्ट झाले अन् पृथ्वीराज चव्हाण कामाला लागले. गेल्याच आठवड्यात त्यांनी जिल्ह्यातील अजिंठा आणि वेरूळ लेणींच्या प्रतिकृती उद्घाटनासाठी हजेरी लावली आणि त्यानंतर लगेचच शनिवारी ते पुन्हा जिल्ह्यात येत आहेत.

वेगळ्या प्रतिमेसाठी..
जनमानसात वावरणारा मुख्यमंत्री अशी प्रतिमा तयार करणे.
तातडीने निर्णय घेतो, कार्यकर्त्यांना भेटतो, ग्रामीण भागात सभा घेतो असे चित्र दाखवणे.
जिल्हा हा कधी काळी काँग्रेसचाच बालेकिल्ला होता. सध्या येथे काँग्रेसची वाताहत झाल्याचे चित्र आहे.
येथे पुन्हा नव्याने उभारी मिळवून देणे. आपण पुन्हा सत्तेवर येऊ शकतो, असा विश्वास कार्यकर्त्यांमध्ये निर्माण करणे.

ते खानदानी नेते आहेत
पृथ्वीराज चव्हाण सामान्यांना किंवा कार्यकर्त्यांना भेटत नाहीत, ही दुसर्‍या पक्षांतील नेत्यांनी तयार केलेली प्रतिमा आहे. प्रसिद्धिमाध्यमांनीही त्याला तसा आकार दिला. प्रत्यक्षात ते खानदानी नेते आहेत. मुख्यमंत्री काय असतो हे त्यांनी दाखवून दिले आहे. सामान्यांत वावरणे हाच त्यांचा स्वभाव आहे. राहिला अशोकरावांचा प्रश्न, तर ते आमचे नेते आहेत. तेही सभांना येतील. केशवराव औताडे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस