आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वैचारिक तलवारी बाहेर काढून कामाला लागा; पत्रकारांना त्यांचे काम करू द्या- अशोक चव्हाण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - आगामी निवडणुकीचा प्रचार करताना विरोधकांनी मोठा भूलभुलय्या निर्माण केला आहे. त्यातून बाहेर पडण्याची गरज आहे. पण काय होईल, कसं होईल, असा विचार करत बसलो तर मग मात्र काही खरं नाही, असा इशारा देतानाच सत्ता टिकवायची असेल तर वैचारिक तलवारी बाहेर काढून कामाला लागा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सेवा दलाच्या कार्यकर्त्यांना केले.
तापडिया नाट्यमंदिरात शुक्रवारी आयोजित सेवा दलाच्या मराठवाडा विभागीय कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दायमा होते, तर शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा, आमदार डॉ. कल्याण काळे, अब्दुल सत्तार, माजी खासदार उत्तमसिंह पवार, चंद्रभान पारखे, बनवारीलाल शर्मा, जिल्हाध्यक्ष केशवराव औताडे, सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष विलास औताडे, शहराध्यक्ष प्रमोद राठोड उपस्थित होते.
पुन्हा 100 टक्के सत्ता येईल, असे काम काँग्रेस सरकारने करून ठेवले आहे. फक्त विरोधकाच्या भूलभुलय्यातून बाहेर पडण्याची गरज आहे. खोटं बोल पण रेटून बोल असे अभियान विरोधकांनी चालवले असून खरा प्रचार करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने घरोघर जाण्याची गरज असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. आम आदमी आपल्या सोबत आहे, तेव्हा वैचारिक तलवारी काढून कामाला लागा, असा सल्ला त्यांनी दिला. सरकारने केलेल्या कामाचे मार्केटिंग करण्यात आपण कमी पडतो, असे दर्डा म्हणाले, अशोकरावांविषयी पेपरमध्ये काय छापून येते, कोर्टात काय सांगितले जाते, याच्याशी सामान्य कार्यकर्त्याला काहीही देणे-घेणे नसून महाराष्ट्राला तुमची गरज आहे, असे सांगत प्रचारात दाखल व्हा, अशी साद दायमा यांनी घातली.

पुढील स्लाइडमध्ये, चव्हाण म्हणाले, पत्रकारांना त्यांचे काम करू द्या !