आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसजनांनीच ठोकले गांधी भवनाला टाळे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महानगरपालिका निवडणुकीत स्वतंत्र लढावे, राष्ट्रवादीसोबत आघाडी करू नये, या मागणीसाठी बुधवारी शहागंज येथील गांधी भवनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने केल्यानंतर गुरुवारी अन्य कार्यकर्त्यांनी या इमारतीला थेट टाळे ठोकले. राष्ट्रवादीला जागा सोडण्यात आल्या तर हे टाळे उघडू दिले जाणार नाही, २२ एप्रिलला मतदान होईपर्यंत आम्ही राखण राहून या इमारतीत कोणालाही येऊ दिले जाणार नाही, असा इशाराही या वेळी देण्यात आला होता.
बुधवारी निदर्शने होत असताना प्रतिष्ठित कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, गुरुवारी टाळे ठोकत असताना परिचित चेहरा समोर आला नाही. ही स्टंटबाजी असल्याचे काहींचे म्हणणे असले तरी शिवसेना-भाजपची युती होणे किंवा न होणे यावरच आघाडी अवलंबून असून त्यासाठी ही मंडळी दबावतंत्राचा अवलंब करत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. असे असले तरी शनिवारी याच इमारतीत बैठक होणार असल्याचे शहराध्यक्ष अॅड. सय्यद अक्रम यांनी म्हटले आहे. कार्यकर्त्यांना त्यांची बाजू मांडण्याचा अधिकार असला तरी हा प्रकार चुकीचा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पुढे वाचा... 'चमकोगिरी' करणाऱ्यांना आचारसंहितेत चाप