आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसमध्ये तिकिटासाठी युवा नेत्यांमध्ये नाराजी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - काँग्रेस पक्षामध्ये तिकिटासाठी इच्छुकांची गर्दी झाली आहे. युवा नेत्यांना पक्षाने सध्या दुय्यम स्थान दिल्यामुळे पाच नेत्यांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. पक्षश्रेष्ठींनी मुलाखती घेतल्या, मात्र तिकीट मिळण्याची शक्यता खूपच कमी असल्यामुळे तरुण नेते बेचैन झाले आहेत.

एनएसयूआय, युवक काँग्रेसमध्ये अनेक जण कित्येक वर्षांपासून काम करत आहेत. आता या तरुण नेत्यांनी वरिष्ठांकडे तिकिटाची मागणी केली आहे. हर्षनगर वॉर्ड क्रमांक ११ मधून मसरूर खान, न्यायनगर वॉर्ड क्रमांक ७९ मधून अखिल पटेल, अल्तमश कॉलनी वॉर्ड क्रमांक ६१ मोईन इनामदार, रोजेबाग-भारतमातानगर वॉर्ड क्रमांक १० मधून नदीम सौदागर, गणेश कॉलनी वॉर्ड क्रमांक २५ मधून शेख अथर हे नेते मनपा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. या सर्वांनी पक्षाकडे मुलाखती दिल्या. तरुणांनी राजकारणात यावे, असे खुद्द राहुल गांधी सांगतात, तर दुसरीकडे पक्ष तरुणांना पुढे येण्याची संधी देत नाही, असा सूर तरुण नेत्यांमध्ये उमटत आहे. सध्या काँग्रेसने उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या असून कोणाला उमेदवारी द्यायची याविषयी मुंबईत चर्चा सुरू आहे. तरुणांना संधी मिळण्याची शक्यता कमी असल्यामुळे आतापासूनच चिंता पसरली आहे. उप-यांना पक्ष संधी देणार असल्याची कुजबुज सुरू आहे.