आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीएसआयसह हवालदार निलंबित

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- पोलिस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह यांनी सोमवारी एक पोलिस उपनिरीक्षक पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. संबंधित पाेलिस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बीटमध्ये गुन्हे शाखा विशेष कृती दलाने अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.
स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखा, विशेष कृती दल, विशेष पथकांकडून अवैध धंद्यांविरुद्ध कारवाया सुरू असतानासुद्धा काही ठिकाणी अवैध धंदे सुरूच आहे. यामुळे आता ज्या पोलिस ठाणे हद्दीतील बीटमध्ये अवैध धंदे सुरू आहेत, तेथील संबंधित पोलिस अधिकारी किंवा बीट हवालदारावर कारवाई निर्णय पोलिस अधीक्षक सिंह यांनी घेतला अाहे. याची कठोर अंमलबजावणी म्हणून ही धडक निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
अवैध धंदे बंदच हवे
जिल्ह्यातीलकोणत्याही पोलिस ठाणे हद्दीत किंवा बीटमध्ये कोणतेच अवैध धंदे चालणार नाही, याची संबंधित पोलिस ठाणे प्रमुख बीट हवालदाराने दक्षता घ्यावी. अन्यथा संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. अवैध धंदे बंद झालेच पाहिजेत. ज्योतिप्रियासिंह, पोलिसअधीक्षक, जालना
चौघा कर्मचाऱ्यांच्या बदल्याहोऊनही एकाच ठिकाणी ठाण मांडून बसलेल्या चार पोलिस कर्मचाऱ्यांना सोमवारी बदलीच्या ठिकाणी जाण्याचे आदेश देण्यात आले आहे. यात जालना शहरातील दोन तर तालुकास्तरावरील पोलिस ठाण्यातील प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. मात्र, सदर कर्मचाऱ्यांची नावे उशिरापर्यंत समजली नाही. सदर चौघांच्या बदल्या हासुद्धा मंगळवारी चर्चेचा विषय राहिला.