आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकाम विभागाविरोधात उद्या चक्का जाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर- शहरातील सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मांजरी फाटा व लासूर नाका ते भेंडाळा या रस्त्यांच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी शहर बचाव कृती समितीतर्फे सोमवारी (दि. २०) चक्का जाम करण्यात येणार आहे.
याबाबत कृती समितीच्या वतीने बांधकाम विभागाला निवेदन दिले आहे. रस्त्याच्या मागणीसाठी नागरिक अनेक वर्षांपासून आंदोलन करत आहेत. शहर व तालुकावासीयांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या रस्त्याच्या कामासाठी एक कोटी ६० लाखांचा निधी उपलब्ध आहे. परंतु, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळे दररोज या रस्त्यावर अपघात होत आहेत. यापूर्वी १३ जुलै रोजी नागरिक कृती समितीतर्फे शहरातील सर्व स्तरांतील नागरिकांनी तहसीलसमोर धरणे आंदोलन केले होते. या वेळी तहसीलदारांना या रस्त्याच्या कामासंदर्भात १९ जुलैपूर्वी ठोस निर्णय घेण्याविषयी निवेदन देऊन कार्यवाही करण्याची मागणी केली.
बातम्या आणखी आहेत...