आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कन्नडमध्ये नियमबाह्य वसाहतीवर नगरपालिकेचा हातोडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड शहरात ३५ वर्षांपासून असलेल्या वसाहतीचे अतिक्रमण हटवताना कर्मचारी. - Divya Marathi
कन्नड शहरात ३५ वर्षांपासून असलेल्या वसाहतीचे अतिक्रमण हटवताना कर्मचारी.
कन्नड - शहरातील ३५ वर्षांपासून असलेल्या भीमनगरच्या वसाहतीवर कन्नड नगर परिषदेने अतिक्रमणाचा हातोडा लगावला. या कारवाईमुळे महिलांना अश्रू रोखने अनावर झाले होते.
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार कन्नड नगर परिषदेने अतिक्रमणाविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. मंगळवारी सकाळी साडेआठ वाजेपासून दोन जेसीबीच्या साहाय्याने अतिक्रमण पाडण्यास सुरुवात केली. नगर परिषदेच्या शहर विकास आराखड्यानुसार ८० फुटांचा हा रस्ता आहे. सुरुवातीलाच रस्ता बंद असल्याने तो मोकळा करण्यात आला.

मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाची ही वस्ती होती. या कुटुंबीयांच्या घरातील चुली हाताला काम मिळाले तरच पेटल्या जातात. मात्र आता राहण्यासाठी असलेला निवाराही गेला. त्यामुळे ३५ वर्षांपासूनच्या घरावर हातोडा पडल्याने महिलांना अश्रू रोखणे अशक्य झाले होते. ही माणसे मोलमजुरी करणारी असल्याने ती भाड्यानेदेखील घरे घेऊ शकत नाही. बेघर झाल्याने आता राहायचे कोठे असा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर पडला आहे. मानसिकदृष्ट्या ते पूर्णतः कोलमडून पडले आहेत. या वेळी पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग, स्वप्ना शहापूरकर, ज्ञानेश्वर पायघन, अशोक तुपे आदी उपस्थित होते.
पर्यायी जागा, घरे देऊन पुनर्वसन करा
भीमनगर,भोईवाडा वसाहतीमधील राहणारे कुटुंबे अत्यंत गरीब व दलित समाजाची आहेत. ही कुटुंबे ३५ वर्षांपासून येथे राहतात. या कुटुंबांना निवाऱ्यासाठी अन्यत्र जागा नाही. ही कुटुंबे त्यांची मुले, घरातील महिला वृद्ध यांचा राहण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या कुटुंबांनीआयुष्याची संपूर्ण कमाई या घरांसाठी लावली होती. ही कुटुंबे अक्षरशः रस्त्यावर आली आहेत. नगरपालिकेने पर्यायी जागा, घरे द्यावीत. असे न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जातीअंत संघर्ष समितीच्या वतीने राजानंद सुरडकर, डॉ. प्रतिभा अहिरे, चंद्रकांत लाडे यांनी दिला.