आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरमगाव शिवारातील निकृष्ट सिमेंट नाल्याचे बांधकाम पाडले बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद- तालुक्यातील विरमगाव शिवारात सिमेंट नाला बंधाऱ्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे देवळाणा येथील शेतकऱ्यांनी बांधकाम उपसभापती गणेश अधाने यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हे बांधकाम बंद पाडण्यात आले.

तालुक्यातील विरमगाव शिवारात  खुलताबाद लघु पाटबंधारे विभागामार्फत होत असलेले सिमेंटनाल्याच्या बांधकामात १०  वाळूचे टोपले व १२ गिट्टी टोपल्यांच्या मिश्रणामध्ये केवळ अर्धा गोणी सिमेंट वापरून बोगस काम होत असल्याचे उपसभापती यांनी केलेल्या पाहणीदरम्यान उघडकीस आले.  महाराष्ट्र दुष्काळमुक्त व शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी जलसंवर्धनाच्या योजनांवर कोट्यवधींचा खर्च करत असून आमदार प्रशांत बंब यांच्या पुढाकाराने विविध विकासकामे होत अाहेत. तसेच सिनेअभिनेता अामिर खान यांच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतील पाणी फाउंडेशनअंतर्गत अनेक शेतकऱ्यांसह सामान्य नागरिक श्रमदानाच्या कामात घाम गाळत अाहेत, तर दुसरीकडे लघु पाटबंधारे विभागातील अधिकारी घरबसल्या शासनाला लाखो रुपयांचा चुना लावत असल्याचे उपसभापतींसह देवळाणा शेतकऱ्यांनी समोर आणले आहे.  विरमगाव येथील शेतकरी सांडू अधाने, रामराव अधाने यांच्या गट नं. ६१ मधील शेतातून जात असलेल्या जांभूळ नाल्यात सिमेंट नाला बांधकाम होत आहे. या कामाला १५ लाखांचा निधी मंजूर झालेला आहे.  विरमगावसह देवळाणा येथील शेतकरी दिलीप मालोदे, रियाज पठाण, भानुदास काळे, अण्णा चाबुकस्वार, दिलीप बनकर, अयुब पठाण आदींनी  विरमगाव गट नंबर ६१ मध्ये सुरू असलेल्या या  सिमेंट नाला बांधकामाची पाहणी केली. तेव्हा त्यांना   कामात मातीमिश्रित वाळू वापरली जात असल्याचे आढळून आले. तसेच सिमेंट कामात लोखंडी सळयांची बांधणी न करता चार ते पाच फुटांच्या लोखंडी सळयांचे तुकडे करून कामात वापरले जात असल्याचे शाखा अभियंता एम. बी. मापारी यांच्या निदर्शनास आणून दिली. सर्व शेतकऱ्यांनी मापारी यांना विनंती केली होती. परंतु शाखा अभियंता मापारी यांनी शेतकऱ्यांचे काही न एेकता काम सुरूच ठेवले. 
बातम्या आणखी आहेत...