आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"पाडापाडी' टाळण्यासाठी विकासकांना प्रशिक्षण द्यावे- अनंत राजेगावकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- सातारा-देवळाईपरिसरातील अनधिकृत बांधकामांमध्ये क्रेडाई सदस्यांचा समावेश नाही. मात्र, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी पाडापाडी टाळण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांना प्रशिक्षण देण्याची गरज अाहे, असे मत महाराष्ट्र क्रेडाईचे अध्यक्षयांनी शुक्रवारी येथे मांडले.
शुक्रवारी हॉटेल रामा इंटरनॅशनलमध्ये आयोजित क्रेडाईच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते.
ते म्हणाले, डीएमआयसीमुळे आैरंगाबादचा चेहरा बदलणार असून आैरंगाबाद परिसरात बांधकाम क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध होतील. रेडीरेकनरसंबंधी शासनदरबारी सतत पाठपुरावा करूनही दरात कुठलीही कपात केली जात नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. रेडीरेकनरच्या वाढलेल्या दराचा फटका आैरंगाबाद परिसरातील क्षेत्राला बसला आहे. घरांच्या किमती कमी होण्याऐवजी क्लिष्टता वाढणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. भविष्यात याचा विचार करावा लागेल, असेही राजेगावकर यांनी सूचित केले. आैरंगाबाद क्रेडाईची वाटचाल योग्य दिशेने सुरू असून त्यांनी राज्याला दिशा देण्याचे काम केल्याचे गौरवोद‌्गार काढून आैरंगाबाद क्रेडाई पदाधिकाऱ्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधींकडे पाठपुरावा करून बांधकाम क्षेत्रातील अडचणी सोडविण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कायद्यांची माहिती घ्या
महाराष्ट्रप्रादेशिक नगररचना अधिनियमाची माहिती बांधकाम व्यावसायिकांना व्हावी. मोफा कायदा, अपार्टमेंट कायदा आदींची योग्य माहितीही व्यावसायिकांनी करून घेतल्यास कामात कुठल्याच अडचणी येणार नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.
क्रेडाई आैरंगाबादच्या अध्यक्षपदी सुनील पाटील, सचिवपदी विकास चौधरी यांची निवड करण्यात आली. या वेळी त्यांचे तुळशीचे रोप देऊन स्वागत करताना क्रेडाईचे राष्ट्रीय अध्यक्ष सी. शेखर रेड्डी, राजेंद्रसिंग जबिंदा, क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष अनंत राजेगावकर, पापालाल गोयल, प्रमोद खैरनार आदी .क्रेडाई महाराष्ट्रच्या सर्वसाधारण सभेला आैरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे यांनीही उपस्थिती नोंदवली.