आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहक तक्रार मंचाचा इंडस टॉवरला दणका, तक्रार फेटाळून लावत कंपनीलाच ठोठावला दंड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - विजबिल भरुनही महावितरणने कंपनीचा विज बिल खंडीत केला, अशी तक्रार सिल्‍लोड येथील इंडस मोबाईल टॉवर कंपनीने ग्राहक तक्रार मंचात दाखल केली होती. मात्र ग्राहक मंचाने कंपनीची तक्रार फेटाळून लावत उलट कंपनीलाच वेळेत वीज बिल भरले नाही म्‍हणून दहा हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.  

सिल्‍लोड तालुक्‍यातील अजिंठा गावात इंडस कंपनीचे मोबाईल टॉवर असून त्यास महावितरणकडून वीज पुरवठा केला जातो. याठिकाणी कंपनीला नोव्हेंबर, 2016 मध्‍ये 2 लाख 27 हजार 10 रूपये एवढे विजबिल आले होते. हे विजबिल भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2016 होती. मात्र कंपनीने वेळेत हे बिल न भरल्याने महावितरणच्या सिल्लोड उपविभागाने 15 दिवसांसाठी तात्पुरत्या स्वरूपात वीज पुरवठा खंडित करण्याची नोटिस कंपनीला 06 जानेवारी, 2017 रोजी दिली होती. 
 
तरीदेखील कंपनीने विज बिल अदा केले नाही. म्हणून अखेर महावितरणे कंपनीचा वीज पुरवठा खंडित केला होता.  त्यानंतर अजिंठा ए.डी.सी.सी. बॅंकेत 23 जानेवारी 2017 रोजी धनादेशद्वारे भरणा केल्याचे कंपनीतर्फे सांगण्यात आले. मात्र बॅंकेने हा धनादेश 04 फेब्रुवारी 2017 रोजी वठवला.
 
त्‍यामुळे पैसे भरूनही मोबाईल टॉवरचा वीज पुरवठा महावितरणने खंडित केला, अशी तक्रार कंपनीने ग्राहक तक्रार मंचाकडे 01 फेब्रुवारी, 2017 रोजी केली होती. या तक्रारीची सुनावणी करताना ग्राहक मंचाने इंडस टॉवर कंपनीचा तक्रार अर्ज फेटाळून लावला. याऊलट महावितरणचे वीज बिल वेळेत न भरता महावितरण विरूध्दच तक्रार दाखल केली म्‍हणून कंपनीला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला. यावेळी ग्राहक मंचाने वेळेत धनादेश न वठविल्याबदल ए.डी.सी.सी.बॅंकेवरही ताशेरे ओढले व पुन्‍हा असे होणार नाही याकडे बँकेने लक्ष द्यावे, अशी ताकिद दिली.     
 
बातम्या आणखी आहेत...