आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Consumer Forum Effect : Bank Give 4.80 Lakh To Suvarna Ughade

ग्राहक मंचाने दणका देताच बँकेकडून सुवर्णा उघडे यांना 4.80 लाख परत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर - धनादेशावर बनावट सही करून खात्यातून 4 लाख 80 हजार रुपये गायब झाल्याच्या प्रकरणात ग्राहक मंचाने दणका देताच बँकेने महिला खातेदार सुवर्णा चांगदेव उघडे यांना सर्व रक्कम परत केली आहे. धरणग्रस्त कॉलनीतील सुवर्णा यांनी दोन वर्षांपूर्वी हैदराबाद बँकेत 4.80 लाखांची रक्कम जमा केली. पुढे एकदा रक्कम काढली गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. बनावट सही करून धनादेशाद्वारे ती गायब करण्यात आली होती.
पोलिसांत तक्रार देऊन त्यांनी ग्राहक मंचातही दाद मागितली. सुवर्णा यांची स्वाक्षरी पुणे व हैदराबाद येथे तपासणीसाठी गेली. धनादेशावरील स्वाक्षरी बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तडजोड होऊन सुवर्णा यांना बँकेने रकमेचा डीडी दिला. रकमेवरील व्याजासाठी सुवर्णा यांनी बँकेला पत्रही दिले आहे.