आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहक संरक्षण कायदा सोपा अन् सुटसुटीत ग्राहक दिनानिमित्त

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्यक्रमात ग्राहक मंचाच्या सदस्या रेखा कापडिया यांनी व्यक्त केले मत - Divya Marathi
कार्यक्रमात ग्राहक मंचाच्या सदस्या रेखा कापडिया यांनी व्यक्त केले मत
औरंगाबाद : ग्राहक संरक्षण कायदा हा अत्यंत सोपा आहे. त्याचबरोबर त्याचा वापर करण्यासाठी तो सुटसुटीत असल्याने सहज लक्षात येतो. त्यामुळे फसगत झालेल्या ग्राहकांनी या कायद्याचा आधार घेण्याचे आवाहन ग्राहक मंचाच्या सदस्या रेखा कापडिया यांनी बजाज नगरात केले. 
 
येथील दगडोजीराव देशमुख महाविद्यालयात गृह विज्ञान विभागातर्फे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त आयोजित ग्राहक जाणीव जागरूकता या विषयावर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
 
ग्राहक मंचाच्या कार्यपद्धतीबद्दल विविध उदाहरणे देऊन त्यांनी सखोल माहिती दिली. प्राचार्य डाॅ. कल्याण लघाने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्था सचिव विजय राऊत, नीलिमा काळे, अनुजा कंदी, सुनंदा पगार, नेत्रा शेळके यांच्यासह विद्यार्थ्यांची कार्यक्रमास उपस्थिती होती. 
 
 
बातम्या आणखी आहेत...