आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Container And Tempo Accident On Aurangabad Dhule Highway

सौंदलगाव पाटीजवळ कंटेनर-टेम्पोची धडक; ब्रिजवाडीचा युवक ठार, जण जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोड- औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्रीजवळ सौंदलगाव पाटीजवळ मंगळवारी दुपारी एक वाजेदरम्यान कंटेनर-टेम्पोची समोरासमोर धडक झाली. या अपघातात एक जण ठार, तर जण जखमी झाले. मृत सर्व जखमी हे औरंगाबाद येथील ब्रिजवाडीचे रहिवासी असून जखमींना औरंगाबादच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
औरंगाबादहून रामपूर (ता. गेवराई) येथे लग्नासाठी डीजे घेऊन जाणाऱ्या टेम्पो बीडहून औरंगाबादला जाणाऱ्या कंटेनरची साैंदलगाव पाटीजवळ मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास समोरासमोर धडक झाली. यात टेम्पोतील बबन गोकुळ परमेश्वरी (२०, रा. ब्रिजवाडी, औरंगाबाद) हा जागीच ठार झाला, तर गणेश केशव खराबे (२२), करण विजय जाधव (२५), विनोद श्रीराम भोजने (३४), रवींद्र उत्तम जाधव (२२), महेश दादाराव खोतकर (२७, सर्व रा. ब्रिजवाडी, औरंगाबाद) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील घाटीत हलवण्यात आले. दरम्यान, अपघातातील मृताचे वडीगोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.
औरंगाबाद-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील अपघातात टेम्पोचा चेंदामेंदा झाला.