आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Contaminated Water Issue At Aurangabad, Divya Marathi

गौतमनगराच्या सार्वजनिक नळाला दूषित पाणीपुरवठा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वॉर्ड क्रमांक 59 अजबनगर, खोकडपुरा भागातील गौतमनगर येथील सार्वजनिक नळाच्या पाण्यात जीवजंतू आणि कीटक निघाले आहेत. यापूर्वीही पाण्यातून जंतू निघण्याचा प्रकार घडला आहे. सार्वजनिक नळाजवळ नाली असल्याने लिकेज होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पिण्याच्या पाण्यात जीवजंतू निघत असल्याने आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

गौतमनगरात 50 ते 60 घरे आहेत. सार्वजनिक नळाजवळ खुल्या गटारी असल्यामुळे लिकेज झाल्याची शक्यता आहे. नाल्याची स्वच्छता होत नसल्यामुळे डासांचे प्रमाणही वाढले आहे. कर्मचारी नाल्या साफ करत नसल्यामुळे दुर्गंधी वाढली आहे. गटारातील पाणी नळामध्ये मिर्शित होत आहे. त्यामुळे पाण्याची दुर्गंधी येत असून जीवजंतू निघत आहे. हे पाणी प्यायचे कसे असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
दिव्य मराठी हेल्पलाइन
तुमच्या समस्या आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. त्यासाठी आमच्या प्रतिनिधींना 9765070333, 9028045199 या मोबाइल क्रमांकांवर समस्या कळवा.
सार्वजनिक नळातून येणार्‍या पाण्याची दुर्गंधी येत असून पाण्यात अळ्या निघाल्या आहेत. अस्वच्छ पाण्यामुळे आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. साधना जसाभाटी, रहिवासी
गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. यापूर्वीही पाण्यातून अळ्या निघालेल्या आहेत. मनपाने याकडे लक्ष देऊन समस्या सोडवावी. स्वप्निल पगडे, रहिवासी

काय म्हणतात नागरिक ?
काही दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. दूषित पाणीपुरवठा होत असल्यास तत्काळ पाणीपुरवठा अधिकार्‍यांना सांगून कर्मचारी पाठविण्यात येईल. सुनीता सोनवणे, नगरसेविका

काय म्हणतात जबाबदार
नळाला येणार्‍या पाण्याचा पिण्यासाठी वापर होतो. परंतु याच नळातून अळ्यायुक्त पाणी निघाल्यामुळे याची तपासणी करायला हवी. सविता बनकर, रहिवासी
खोकडपुर्‍यातील गौतमनगर येथील सार्वजनिक नळाला दूषित पाणी येत आहे. इन्सेट: नळाच्या पाण्यात निघालेल्या अळ्या.