आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्षभरापासून दूषित पाणीपुरवठा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - वॉर्ड क्रमांक ५१ इंदिरानगर-बायजीपुरा भागात वर्षभरापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. गल्ली नं. २७ मध्ये राहणाऱ्या ४० घरांना सकाळी चार वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत पाणीपुरवठा केला जातो. अर्धा तास नळातून दुर्गंधीयुक्त काळसर आणि ड्रेनेजमिश्रित पाणी येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

बायजीपुरा भागात नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. तीन-चार दविसांआड येणाऱ्या पाण्यावर नागरिकांची तहान भागवणे अवघड झाले आहे. ड्रेनेजमिश्रित पाण्यामुळे लहान मुले आजारी पडत आहेत. याबाबत अनेकदा नगरसेवक, पाणीपुरवठा विभाग यांच्याकडे लेखी निवेदन देऊनही दूषित पाण्याचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यासाठी बोअरवेअलचे पाणी प्यावे लागत असताना नागरिकांची दूषित पाण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यात यावी, अशी मागणी सलीमउल्ला कलीमउल्ला, मुख्तार बेग खादर बेग आदींनी केली.