आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज अवमान याचिकेवर होणार अंतिम सुनावणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- ग्रंथपालांना सुधारित वेतनर्शेणी (बीएड समकक्ष) लागू करण्यात यावी, या मागणीसाठी राज्यभरातील ग्रंथपालांनी मुंबईतील आझाद मैदानावर शासनाच्या विरोधात निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सचिन दिवकर या ग्रंथपालाने दाखल केलेल्या अवमान याचिकेवर शुक्रवारी 13 जून रोजी मुंबई उच्च न्यायालयात अंतिम सुनावणी होणार आहे. डीबी स्टारने ‘न्यायालयाकडून न्याय, सरकारचा अन्याय’ या मथळ्याखाली 17 ऑगस्ट रोजी वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर त्याचा पाठपुरावाही सुरू आहे.
राज्यातील तिन्ही खंडपीठांमध्ये दाखल करण्यात आलेल्या जवळपास 225 याचिकांचा निकाल ग्रंथपालांच्या बाजूने लागला आहे. सुप्रीम कोर्टाने कोणताही स्टे दिलेला नसताना ग्रंथपालांना सुधारित वेतनर्शेणी लागू करण्यास शासनाकडून टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे ग्रंथपालांनी तिन्ही खंडपीठांमध्ये अवमान याचिकासुद्धा दाखल केल्या आहेत. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्य शासनाने 1 एप्रिल 2014 रोजी जीआर काढला. मात्र, त्यात जुन्याच म्हणजे डीएड समकक्ष वेतनर्शेणीचा उल्लेख आहे. वास्तविक न्यायालयाने बीएड समकक्ष सुधारित वेतनर्शेणी लागू करण्यास सांगितले होते. त्यामुळे आता शुक्रवारी होणार्‍या अंतिम सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.