आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
औरंगाबाद - 18 कोटींच्या पहिल्या टप्प्यातील 10 रस्त्यांच्या कामाची अनामत रक्कम अखेर मंगळवारी सायंकाळी ठेकेदाराने भरल्याने मनपाने सुटकेचा नि:श्वास टाकला. दुसरीकडे, 12 कोटींच्या कामांसाठी या ठेकेदाराचे मन वळवण्याचा प्रयत्न सुरू असून आधी शब्द दिल्याप्रमाणे 10 टक्के जादा दराने काम न दिल्याने आणि या कामांचे पैसे वेळेवर मिळतील की नाही, हा प्रश्न त्यांना सतावत असल्याने ठेकेदाराने पुढील कामांत रस दाखवलेला नाही, असे समोर आले आहे. 18 कोटींच्या व्हाइट टॉपिंगच्या पहिल्या टप्प्यातील 10 रस्त्यांचे पुण्याच्या जेपी एंटरप्रायझेस या ठेकेदाराने मिळवले; पण हा ठेकेदारही अनामत रक्कम भरून कामाची वर्क ऑर्डर घ्यायला पुढे येत नसल्याने मनपा हवालदिल झाली होती. याशिवाय दुसर्या टप्प्यातील व्हाइट टॉपिंगच्या कामांसाठीदेखील या ठेकेदाराने रस न दाखवल्याने आणखीच भर पडली.
अनामत अखेर भरली
गेल्या तीन दिवसांपासून मनपा या ठेकेदाराला 18 कोटींच्या कामांची वर्क ऑर्डर देण्यासाठी अनामत रक्कम घेण्याची वाट पाहत होती. आज सायंकाळी 37 कोटी रुपयांची अनामत भरण्यात आली असून दोन दिवसांत वर्क ऑर्डर दिली जाऊन लवकरात लवकर काम सुरू केले जाईल. स्थायी समितीत रस्ते : आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतही रस्त्यांचा विषय निघाला. जगदीश सिद्ध यांनी 9 महिन्यांत रस्ते पूर्ण होतील का, असा सवाल करीत आधी दोन रस्ते, नंतर बाकीचे या गतीने काम केल्यास 9 महिन्यांचा वेळ पुरेल असे वाटन नाही, शिवाय पावसाळ्यात कामात अडथळे येतील, अशी शंका त्यांनी उपस्थित केली. समीर राजूरकर यांनीही रस्त्यांची कामे वेळेवर झाली पाहिजेत, असे सांगितले. त्यावर बोलताना शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी सगळी कामे वेळेत पूर्ण होतील, असा विश्वास व्यक्त केला.
काम वेळेवर सुरू होईल : ‘दिव्य मराठी’शी बोलताना शहर अभियंता सखाराम पानझडे यांनी पहिल्या टप्प्यातील रस्त्यांची कामे वेळेवर सुरू होतील, असे सांगितले. दुसर्या टप्प्यासाठी ठेकेदार येत नसल्याबाबत बोलताना ते म्हणाले की, ही खुली स्पर्धा आहे. ठेकेदार येतील, निविदा भरतील.
ठेकेदाराला का झाला नाराज?
18 कोटींची कामे करणार्या ठेकेदाराने दुसर्या टप्प्यासाठी का रस दाखवला नाही, याचा शोध घेतला असता धक्कादायक माहिती समोर आली. या ठेकेदाराला हे काम करण्यासाठी निविदेपेक्षा 10 टक्के अधिक दराने दिले जाईल, अशी कमिटमेंट काही पदाधिकार्यांनी दिली होती. पण तिजोरीतील खडखडाटामुळे रस उरला नाही.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.