आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाच कोटी १३ लाख रुपयांची फसवणूक, सबठेकेदाराला गंडवल्याप्रकरणी दोघे अटकेत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज- रखडलेल्या ड्रेनेजलाइन प्रकल्पातील सबठेकेदाराची पाच कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईच्या भारत उद्योग कंपनीच्या दोघांना वाळूज एमआयडीसी पोलिसांनी नुकतीच अटक केली.
एमआयडीसी प्रशासनाने बजाजनगरात ड्रेनेजलाइनचा प्रश्न निकाली काढण्यासाठी एटीपी प्रकल्प उभारण्याचा निर्णय सन २०११ मध्ये घेतला.
या प्रकल्पावर १२ कोटी ६० लाख रुपये खर्च होणार होते. या कामाचे कंत्राट मुंबईच्या भारत उद्योग लिमिटेड या कंपनीला मिळाले होते. कंपनीने हे काम बेलापूर येथील एसडीडब्ल्यूडी इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीला दिले. एसडीडब्ल्यूने बजाजनगरातील अशोक शिनगारे यांच्या साई ग्रुप फर्मला करार करून हे काम दिले होते. काम सुरू असताना भारत उद्योग कंपनीच्या संचालकांनी परस्पर एमआयडीसीकडून पैसे घेतले. या प्रकल्पाचे काही काम केल्यानंतर साई ग्रुपचे अशोक शिनगारे यांनी भारत उद्योग कंपनीच्या संचालकांकडे बिलासाठी पाठपुरावा सुरू केला. संचालकांनी टाळाटाळ केल्यामुळे दोन महिन्यांपूर्वी शिनगारे यांनी पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेऊन कोटी १३ लाख ७८ हजार ४८५ रुपयांची फसवणुकीची तक्रार दिली.

चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
आयुक्तांनीतपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपवला. भारत उद्योग लिमिटेड या कंपनीचे संचालक सूर्यकांत कुकरेजा, राम झा, राजेंद्र यादव (सर्व रा. नवी मुंबई) शेख अब्दुल (रा. वाशी नाका, चेम्बूर, मुंबई) या चौघांविरुद्ध १४ ऑक्टोबरला गुन्हा दाखल झाला. आर्थिक गुन्हे शाखेकडून हा गुन्हा नुकताच एमआयडीसी वाळूज ठाण्यात वर्ग झाला.यादव अब्दुल या दोघांना डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिसांनी मुंबईतून राजेंद्र यादव शेख अब्दुल या दोघांना अटक केली. मुख्य आरोपी सूर्यकांत कुकरेजा राम झा यांना अटकपूर्व जामीन मिळाल्याचे पोलिस निरीक्षक रामेश्वर थोरात यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...