आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुण्यातील कंत्राटदाराने शहारातील लॉजमध्ये घेतला गळफास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- पुण्यातील कंत्राटदाराने रेल्वेस्टेशन रोडवरील आरटीओच्या शेजारी असलेल्या हॉटेल रणजितमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली. लक्ष्मणलाल बनवारीलाल सैनी (३४) असे त्यांचे नाव आहे. 


सैनी यांनी शहरात कंत्राट घेतले होते. त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून हॉटेल रणजितच्या रूम नं. १२० मध्ये थांबले होते. शनिवारी साइटवरील सुपरवायझरने मोबाइलवर वारंवार फोन करूनही उचलला नाही. सुपरवायझरने दुपारी १२.३० वाजता हॉटेल गाठले. तेव्हा रूमचा दरवाजा आतून बंद होता. हॉटेल मालकास याची माहिती दिल्यानंतर वेदांतनगर पोलिसांना कळवण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक वनिता चौधरी, पोहेकॉ. एस. बी. पवार यांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडला असता सैनी यांनी पंख्याला गळफास घेतल्याचे दिसले. पोलिसांनी त्यांना घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजू शकले नाही.

बातम्या आणखी आहेत...