आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रक्तासंबंधीत ही काळजी घेतल्यास अनेक आजारांपासून सुटका होईल, जाणून घ्या TIPS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील १९ % पुरुष आणि २० % महिलांना हायपरलिपिडिमिया अर्थात रक्तातील चरबीच्या वाढलेल्या प्रमाणामुळे अनेक आजारांना बळी पडावे लागत असल्याचे आढळले. रक्तातील चरबीचे तीन प्रकार नियंत्रणाबाहेर गेल्याने या आजारांवर प्रतिबंध घालणे गरजेचे आहे. जागतिक आरोग्य दिनानिमित्त हायपरलिपिडिमियाबद्दल तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.

७ एप्रिल जागतिक आराेग्य दिवस म्हणून साजरा केला जातो. या वेळी आजारांच्या प्रमुख कारणांचा वेध घेतला असता हायपरलिपिडिमिया हेही एक कारण अनेक रोगांच्या मुळाशी असल्याचे स्पष्ट होते. ट्रायग्लायसराइड, टोटल कोलेस्टेरॉल आणि एलडीएल कोलेस्टेरॉल या तीन प्रकारांमध्ये रक्तातील चरबी असते. यामुळे हृदयविकार, पॅरालिसिस होतो. मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या कायमस्वरूपी आजारांनाही यातून निमंत्रण मिळते. शेतापासून ताटापर्यंत अन्नाचे संरक्षण करणे यानिमित्ताने गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ४० % रुग्ण मधुमेही असल्याचेही या सर्वेक्षणात म्हटले आहे.

पुढे वाचा, आजार रोखणे शक्य