आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Convict Escaped From Running Bus At Cidco Bus Stand

धावत्या बसमधून त्याने ठोकली धूम, सिडको बसस्थानकातून आरोपी पसार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सिडको बसस्थानकावर बस येताच तिचा वेग कमी झाला अन् आराेपी धावत्या बसमधून खाली उडी मारून क्षणार्धात पसार झाला. हे कधी आणि कसे घडले हे पोलिसांना कळलेच नाही. पकडा-पकडा म्हणेपर्यंत तो दिसेनासा झाला आणि पाेलिस मात्र हात चोळत बसले. त्याचे झाले असे की , आरोपी सतीश नागोबा चव्हाण यास दरोड्याच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. बुधवारी त्याची गेवराई येथील न्यायालयात साक्ष होती.
त्यासाठी त्याला नेले होते. बुधवारी संध्याकाळी त्याला पोलिसांनी बसमधून परत शहरात आणले असता बसचा वेग कमी होताच दाराजवळ बसलेल्या आरोपीने उडी मारून धूम ठोकली. हा प्रकार अनेकांनी पाहिला. एवढेच नव्हे तर तो बसस्थानकातील सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यातही टिपला गेला.

आरोपीला न्यायालयातून हर्सूलमध्ये नेण्याची जबाबदारी पोलिस कर्मचारी बाळा शिंदे आणि रखमाजी राऊत यांच्यावर होती. सिडको बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळच बस थांबली. पोलिसांचे लक्ष विचलित करून त्यांच्या हाताला हिसका देऊन आरोपी जळगाव रोडने वेगाने पळू लागला. संध्याकाळ असल्यामुळे लोकांची वर्दळ होती. काही जणांनी त्याला पळताना पाहिले, पण त्याला पकडण्याचे कोणीच धाडस केले नाही. आरोपीविरुद्ध दुचाकींची चोरी, दरोडा, जबरी चोरीचे गुन्हे आहेत. गुन्हे शाखेच्या ३० आणि एमआयडीसी सिडको ठाण्याच्या २० पोलिसांसह चार्ली पथक त्याचा शोध घेत आहे. एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्रीपाद परोपकारी, गुन्हे शाखेचे प्रशांत आवारे यांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्हीचे फुटेज तपासून त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली आहेत.

पुढे वाचा... हातकडी नसल्यामुळे त्याचे फावले