आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घाटीतून आरोपी पसार; पाच पोलिस निलंबित

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - घाटी रुग्णालयात सिटी स्कॅनसाठी आणलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पलायन केले. घटना गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास घडली. दिलीप राठोड (३५, रा. रांजणगाव शेणपुंजी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणात पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी पाच पोलिस निलंबित केले.

जालना येथील ऊसतोड कामगार १७ वर्षीय युवतीचे प्रेमसंबंधातून अपहरण करत दिलीपने तिला १७ एप्रिल २०१६ रोजी माजलगावहून रांजणगाव शेणपुंजी येथे आणले होते. एका मंदिरात त्याने युवतीसोबत विवाह केला होता. १४ मे रोजी मुलीने आई-वडिलांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याला या गोष्टीचा राग आला आणि त्याने तिच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले होते. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी त्याला जून रोजी अटक करून त्याची हर्सूल कारागृहात रवानगी केली होती.
आजारपणाचाबहाणा : प्रकृतीठीक नसल्याचे कारण सांगितल्याने राठोड याला गुरुवारी सायंकाळी जमादार ए. आर. जगधने, के. सी. पाटील, बी. सी. नरोटे, एस. बी. गवळी आणि शिपाई दीपक चव्हाण यांनी घाटीत नेले होते. राठोडला सिटी स्कॅन विभागात बसवून चव्हाण वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे गेले. हीच संधी साधून राठोड पसार झाला.
बातम्या आणखी आहेत...