आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ 30 मे रोजी; 13 हजार पदवीधर, 360 पीएचडीधारकांना पदवी प्रदान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ५७ वा दीक्षांत समारंभ येत्या ३० मे रोजी घेण्यात येणार आहे. विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी तथा भारताच्या माजी राजदूत निरुपमा मेनन राव या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी दिली. 

व्यवस्थापन परिषदेची बैठक सोमवारी सकाळी घेण्यात आली. कुलगुरू चोपडे अध्यक्षस्थानी होते. या वेळी कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, वित्त लेखाधिकारी शंकर चव्हाण, परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. दिगंबर नेटके, सहसंचालक डॉ. महेश शिवणकर, डॉ. राजेंद्र धामणस्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाच्या ५७ व्या दीक्षांत समारंभास येण्याचे आश्वासन निरुपमा मेनन राव यांनी दिले आहे. राव या विद्यापीठातील इंग्रजी विभागातील माजी विद्यार्थिनी आहेत. भारताच्या माजी पराराष्ट्र सचिव, अमेरिकेच्या माजी राजदूत म्हणून त्यांनी कार्य केले आहे. ३० मे रोजी दुपारी वाजता हा कार्यक्रम होईल. या समारंभात एप्रिल २०१६ ऑक्टोबर २०१६ मध्ये उत्तीर्ण पदवीधारकांना पदवी प्रदान करण्यात येईल. 

२० समित्यांची स्थापना 
सुमारे१३ हजार पदवीधरांनी प्रत्यक्ष समारंभास उपस्थित राहण्यासाठी आवेदन दाखल केले आहे, तर ३६० पीएचडीधारकांनी पदवीसाठी अर्ज केला आहे. दीक्षांत समारंभाच्या नियोजनासाठी २० समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. यात आयोजन, बैठक व्यवस्था, प्रोटोकॉल, प्रसिद्धी, निमंत्रणपत्रिका, भोजन यासह विविध समित्यांचा समावेश आहे, अशी माहिती डॉ. दिगंबर नेटके यांनी दिली. 
बातम्या आणखी आहेत...