आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

औरंगाबादेत बनवणार कूलपॅडचे स्मार्टफाेन, चीनच्या कंपनीची योजना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - स्मार्टफोन निर्मितीतील चीनची आघाडीची कंपनी कूलपॅड आता भारतात विस्तार करणार आहे. बंगळूरु येथे संशोधन व विकास (आर अँड डी) प्रकल्प तर औरंगाबादेत हँडसेट जुळणी प्रकल्प उभारण्याची कूलपॅडची योजना आहे. भारतीय बाजारातील कोट्यवधींची संधी साधण्यासाठी कंपनी भारतात येत असल्याचे कूलपॅड इंडियाचे सीईओ वरुण शर्मा यांनी सांगितले. कूलपॅडने नुकतेच भारतात दोन स्मार्टफोन सादर केले आहेत.शर्मा यांनी सांगितले, भारतीय बाजारपेठेतील मोठ्या संधींचा लाभ घेण्यासाठी कूलपॅडने आता भारतावर लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कंपनीने दोन स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केले आहेत.

औरंगाबादेत हँडसेट जुळणी प्रकल्प टाकण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. त्याशिवाय बंगळुरू येथे कंपनीने संशोधन व विकास प्रकल्पाचे काम सुरू केले आहे. त्यात उत्पादनाविषयी संशोधन होणार आहे. भारतीय बाजाराच्या गरजा लक्षात घेऊन किफायतशीर किमतीतील स्मार्टफोन सादर करण्यावर कूलपॅडचा भर राहणार आहे.

स्नॅपडीलशी भागीदारी : कूलपॅडने भारतीय बाजारात प्रवेश करताना स्नॅपडील या ई-कॉमर्स कंपनीशी भागीदारी केली आहे. कंपनीने कूलपॅड डॅझेन एक्स-७ हा १७,९९९ रुपये आणि कूलपॅड डॅझेन-१ हा ६,९९९ रुपये किमतीचा हँडसेट स्नॅपडीलच्या माध्यमातून बाजारात आणला आहे.

घोषणा दाेन महिन्यांत
औरंगाबादेतील हँडसेट जुळणी प्रकल्पासाठी कूलपॅड किती गुंतवणूक करणार आहे, किती जणांना रोजगार मिळणार आहे याबाबत येत्या १० आठवड्यांत घोषणा होईल, असे शर्मा म्हणाले.

भारतात मोठा वाव
भारतात स्मार्टफोनला चांगला वाव आहे. त्यामुळेच कंपनीने येथे लक्ष केंद्रित करण्याचे ठरवले आहे. ली वँग, अध्यक्ष, डॅझेन कूलपॅड

कूलपॅड : जगभरात सातव्या स्थानी
कूलपॅड चीनची आघाडीची स्मार्टफोन कंपनी असून स्मार्टफोन व्हेंडरमध्ये जगात ७ व्या स्थानी अाहे. वायरलेस कम्युनिकेशन्सचा २० वर्षांचा अनुभव, ड्युएल मोड व ड्युएल स्टँडबाय हँडसेट निर्मितीचे श्रेय कूलपॅडकडे.

कंपनीने भारतात कूलपॅड डॅझेन १ मोबाइल ६,९९९ व एक्स-७ हँडसेट १७,९९९ रुपयांत लाँच केला.