आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Cooperative Sector News In Marathi, Talk Show, Divya Marathi

अपेक्षा जनतेच्या : सभासदांच्या लाभांशावर आयकर नको, साखर भाववाढ करायला हवी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - सहकार क्षेत्राच्या सरकारकडून अपेक्षा सोमवारी "दिव्य मराठी'च्या टॉक शो उपक्रमात जाणून घेण्यात आल्या. सहकारातील राजकीय शिरकाव थांबवावा. सेवाभावी लोकांना स्थान द्यावे. खटले लवकर निकाली काढावेत, अशा अपेक्षा व्यक्त झाल्या. कायद्यातील ९७ व्या घटनादुरुस्तीवरही नाराजी होती.

* कारखाने बंद पडणे थांबवायचे असेल तर साखरेचे भाव वाढवा.
* सभासद, संचालक, कर्मचा-यांना प्रशिक्षण. ऑडिट वर्षातून दोनदा.
* प्रोफेशनल अ‍ॅप्रोच ठेवून संस्थांनी स्पर्धेच्या काळात कॉर्पोरेट व्हावे.
* सभासदांना देण्यात येणा-या लाभांशावर आयकर नको.
* नोक-यांसाठी बँकांप्रमाणेच केंद्रीय भरती प्रणाली आणा.
* व्याजमाफीच्या निर्णयाची जबाबदारी शासनाने घ्यावी.
* शेतमालाच्या भावाचा हक्क द्या,
शेतीआधािरत संस्था टिकतील.

*बाजार समित्यांतील ताेलाई, वाराई कर संकल्पना रद्द करा.
*सहकारी संस्थांसाठी ऑडिटरची नेमणूक आरबीआयकडून व्हावी.
*दाेषी संचालकांकडून वसुलीचे सरकारी धाेरण कडक करावे.
*पतसंस्थांवर नियंत्रण आणावे.
*सहकारी न्यायालये, लवादाची कर्मचारी भरती तत्काळ करावी.
*९७ व्या घटनादुरुस्तीने मोठे नुकसान, ही तरतूद रद्द करावी.
*संस्थांचे विकेंद्रीकरण करून पदाधिका-यांना स्वायत्तता द्यावी
*सहकारासाठी अ‍ॅपेक्स बॉडी हवी.
* जिल्हानिहाय धोरण ठरवून सूतगिरण्या, कारखाने द्या.
* गृहनिर्माण संस्था धोरण चुकीचे.
* अवसायक मंडळ कमिटी नेमा.

0६ ठिकाणी एकाच वेळी झाली चर्चा
१०० हून अधिक आल्या सूचना
६५ मान्यवर

चर्चेत सहभागी
सहकारी साखर कारखाना, िजल्हा बँक, कृषी उत्पन्न बाजार समिती, सी.ए. असाेसिएशन, नागरी सहकारी बँक, ठेवीदार संघटनेचे प्रतिनिधी या वेळी उपस्थित होते.