आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घड्याळात कॅमेरा बसवून एमपीएससी परीक्षेत वापर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- महाराष्ट्र लाेकसेवा अायाेगाच्या रविवारी येथे झालेल्या परीक्षेत एका परीक्षार्थीने हातातील घड्याळामध्ये कॅमेरा बसवून त्याद्वारे परीक्षा पेपरचा फाेटाे काढणे व दुसऱ्याच्या नावावर परीक्षा दिल्याप्रकरणी तिघांविरुद्ध बीड शहर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी नायब तहसीलदार कमल कुटे यांनी फिर्याद दिली अाहे. येथील संस्कार माध्यमिक विद्यालयात रविवारी सकाळी ११.२० च्या सुमारास देवराज गाेवर्धन काकड मूळ परीक्षार्थी अाहे, त्याच्या नावावर दत्तु महादेव बडे हा परीक्षा देत हाेता. दत्तुसह रविराज दहिफळे व देवराज तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला अाहे. बडे व दहिफळेला २७ पर्यंत काेठडी मिळाल्याचे एएसअाय जाधव यांनी सांगितले.