आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका निकृष्ट कामाचा दर्जा तपासणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - हडको एन-9, एच सेक्टरमधील ड्रेनेजच्या निकृष्ट कामाविषयी डीबी स्टारने वृत्त प्रसिद्ध करताच दुसर्‍याच दिवशी मनपा अधिकार्‍यांनी या कामाची पाहणी केली. या निकृष्ट कामाचा दर्जा तपासला जाईल व आठ दिवसांत या कामाची दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासनही या अधिकार्‍यांनी दिले.

या भागात ड्रेनेजचे काम निकृष्ट झाल्याने चेंबरमधील प्रवाह तुंबला आहे. काम सुरू असतानाच श्रीकृष्णनगरमधील रहिवाशांनी आयुक्तांकडे तक्रार केली होती. पण, काहीही फरक पडला नाही. अखेर त्यांनी डीबी स्टारकडे आपली व्यथा मांडली. त्यावर गुरुवार 21 मार्च रोजी डीबी स्टारने ‘ड्रेनेजचे काम निकृष्ट दर्जाचे’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी पालिकेचे शाखा अभियंता एन. वाय. गावंडे यांनी या कामाची पाहणी केली. दुरुस्तीबरोबरच या ठिकाणी पडलेला मलबाही ताबडतोब उचलला जाईल, असेही गावंडे यांनी स्पष्ट केले.


मुळात या भागात दोन अंतर्गत लाइन आणि दोन मुख्य लाइनचे काम करण्यात आले. नागरिकांच्या तक्रारीनंतर दर्जा तपासून आठ दिवसांत काम मार्गी लावण्याचे पत्रही दिले आहे.
महेश माळवदकर, नगरसेवक