आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Corporation Impressively Implementing Tax Colletion For Special Room

महापालिका प्रभावी कर वसुलीसाठी विशेष कक्ष वाढवणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - करवसुलीसाठी एकाऐवजी तीन विशेष कक्षाची स्थापना केली जाणार आहे. चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कर आणि पाणीपट्टीची वसुली प्रभावीपणे व्हावी, यासठी मनपा आयुक्त डॉ. हर्षर्दीप कांबळे यांनी नियोजन केले आहे. त्याअंतर्गत हा निर्णय घेतला आहे. एक मेपासून झोपडपट्टीतील व्यावसायिकांपासून कर वसुली प्रारंभ होईल. तर झोपडपट्टी निवासधारकांकडूनही कर वसुली केली जाणार आहे.

डॉ. कांबळे यांनी पदभार स्वीकारताच सक्तीची करवसुली करण्यासंदर्भात सूचना केल्या. ज्या वॉर्डात कमी करवसुली होईल त्या वॉर्ड अधिकार्‍यावर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्यामुळे 74 कोटी रुपयांची करवसुली करण्यास मनपा प्रशासनाला यश आले. आगामी आर्थिक वर्षासाठीही त्यांनी तसेच नियोजन केले आहे. त्यानुसार एक मे नंतर प्रथम झोपड्डपट्टी व्यावसायिकांकडून कर वसुली करून प्रारंभ केला जाणार आहे. पहिले तीन महिने व्यावसायिकांकडून आणि त्यानंतर झोपडपट्टी निवासीयांकडूनही कर वसूल करण्यात येणार असल्याचे डॉ. कांबळे यांनी दिव्य मराठीला सांगितले. पुढेही अशाच प्रकारे करवसुली मोहीम सुरूच राहावी, अशी मागणी स्थायी समितीच्या बैठकीत गटनेता गिरजाराम, हाळनोर, समीर राजूरकर आदी पदाधिकार्‍यांनी केली होती. त्यावर स्थायी समिती सभापती विकास जैन, महापौर कला ओझा यांनीही तशा सूचना दिल्या आहेत.

महापालिकेची आर्थिक स्थिती नाजूक आहे. पालिकेचा नियोजनशून्य कारभारही त्याला मोठय़ा प्रमाणात कारणीभूत आहे. प्रत्यक्षात 31 मार्चला आर्थिक वर्ष संपल्यानंतर 1 एप्रिलपासून कर वसुलीला प्रारंभ होणे गरजेचे आहे, पण प्रत्यक्षात वर्ष संपत आले की, म्हणजेच फेब्रुवारीमध्ये करवसुलीची सक्ती केली जाते. वेळेवर कर आकारणी केली जात असल्यामुळे नाव, मालमत्ता क्रमांक, रक्कम यामध्ये मोठय़ा प्रमाणावर चुकाही होतात. त्यामुळे करदात्यांनाही मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागते. अनेकदा अधिकारी नागरिकांत वाद होतात. या कटकटीमुळे नागरिक कराचा भरणा करण्यास पुढे येतच नाहीत. या सर्वांचा परिणाम करवसुलीवरही होतो.
वॉर्ड मागणी कोटीत मालमत्ता कर टक्केवारी
अ 10.45 6,47,16,259 61.91
ब 22.20 11,74,60,664 52.88
क 8.70 2,88,22,715 33.10
ड 20.90 14, 33,32,211 68.56
ई 15.75 7, 23, 93, 690 45.90
फ 22.30 14, 91, 7, 411 66.86
एकूण 100 58,21,67,016 58.21
वसुलीसाठीचे नियोजन
* जूनअखेरपर्यंत ऑनलाइन व्यवस्था उपलब्ध करून देणार, एका कक्षाऐवजी करवसुलीसाठी तीन विशेष कक्ष स्थापन करणार
* सपना वसावा, शुभांगी आंधळे आणि विठ्ठल डाके यांची विशेष कक्षप्रमुख म्हणून निवड
* नवीन मालमत्ता शोधून प्रभावी वसुलीसाठी अधिकार्‍यांनी उद्दिष्ट ठरवून देणार
* वाणिज्य, निवासी, निवासेतर आणि शासकीय अशी करवसुलीची स्वतंत्र व्यवस्था निर्माण करणार
* कराची नियमाप्रमाणे आकारणी होते किंवा नाही याची पाहणी करण्यासाठी तीन अधिकर्‍यांचे पथक
* पथक पाहणी करून आयुक्तांना माहिती देणार

करवसुली करावी
शहरात दोन लाखांवर मालमत्ता आहेत. यापैकी अध्र्यापेक्षा अधिक मालमत्ताधारक कराचा भरणा करत नाहीत. व्यावसायिक आणि शासकीय करवसुलीही प्रभावीपणे होत नाही. तेव्हा वाणिज्य, निवासी आणि शासकीय कराची प्रभावी वसुली करण्यात यावी. बालाजी मुंढे, नगरसेवक

स्वतंत्र नोंद असावी
शासकीय, वाणिज्य आणि निवासी मालमत्ता किती आहेत. त्यांच्याकडून वसूल होणारा कर हा किती मिळतो. तो कधी वसूल करण्यात आला. याची स्वतंत्र नोंद केलेली असावी. कर भरण्यासाठी ऑनलाइन सेवा उपलब्ध करून द्यावी. समीर राजूरकर, नगरसेवक