आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालिकेने वाढवली नागरिकांची अडचण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - रस्ते दुरुस्ती, पेव्हर ब्लॉक बसवणे, पॅचवर्क इत्यादी कामे उशिरा आणि निकृष्ट करण्याची पालिकेची नेहमीची सवय आहे. त्यातही अर्धवट काम करून पसार होण्याची परंपरा कायम आहे. असाच प्रकार सिडको एन-5 टाऊन सेंटर भागात सुरू आहे. येथे ठेकेदाराने पॅचवर्कसाठी खड्डे खोदून ठेवल्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. आधी लहान असलेले खड्डे मोठे करून लोकांच्या अडचणीत भर घातली आहे.
सिडको एन-5 टाऊन सेंटर भागात दोन ठिकाणी पॅचवर्क करण्यासाठी गेल्या 10 दिवसांपासून दोन खड्डे खोदून ठेवण्यात आले आहेत. मात्र, पावसाळ्यात डांबरीकरण करता येत नसल्याचे कारण देत तेथे आता पेव्हर ब्लॉक बसवणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. तेसुद्धा लवकर सुरू होण्याची खात्री नाही. या खड्ड्यामुळे मात्र नागरिकांची तारांबळ उडत आहे. वाहतूक विस्कळीत होणे हा तर रोजचाच प्रकार झाला आहे.

लवकरच खड्डे बुजवणार
माझ्या वॉर्डात डांबरीकरणाचे काम बंद आहे. लोकांची अडचण आम्ही समजू शकतो. खड्ड्याच्या ठिकाणी पेव्हर ब्लॉकचे काम करून हे खड्डे बुजवणार आहोत. लवकरच हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील.
- प्रशांत देसरडा, नगरसेवक

कामाचे पैसे मिळाले नाही

या कामाचे अजूनही अंदाजपत्रक तयार झाले नाही. काम फुटकळ असल्याने 12 हजार रुपयांत करण्याचे तोंडी सांगण्यात आले आहे. पेव्हर ब्लॉक आणि मजुरीचे पैसे मिळाले नसल्यानेच हे काम थांबले आहे.
-संतोष चव्हाण, ठेकेदार