आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर वसुली पथकाची व्यापाऱ्यांना शिवीगाळ?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ९०० व्यापाऱ्यांकडे महापालिकेचा सुमारे ६ कोटींचा कर थकला आहे. या कराची वसुली करण्यासाठी गुरुवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास गेलेल्या कर वसुली पथकाने शिवीगाळ करत कराचा भरणा करण्यासाठी धमकावले, असा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. तसेच रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता केली जात नाही, मग कर मागायला कशाला येता, असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे.

मनपा कर वसुली पथक प्रमुख शिवाजी झनझन व त्यांचे पथक बाजार समितीत गेले होते. या पथकाने अरेरावीची भाषा वापरली व अर्वाच्य शिवीगाळ केली, असा आरोप जिकृउबासचे माजी संचालक हरीश पवार, गयास बागवान व संजय पहाडे आदींनी केला आहे. या प्रकारामुळे जाधववाडीत तणाव निर्माण झाला होता.