आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Corporator Vaidy And Khedkar Get Jail For Six Month In Aurangabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नगरसेवक वैद्य, खेडकर यांना सहा महिन्यांची कैद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दहावीच्या पेपरफुटीची चौकशी करण्यासाठी आलेल्या अधिकार्‍याच्या तोंडाला काळे फासल्याप्रकरणी भारतीय विद्यार्थी सेनेच्या पाच कार्यकर्त्यांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी दस्तगीर पठाण यांनी सहा महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. शिक्षा झालेल्यांत महापालिकेतील शिवसेनेचे सभागृह नेते राजू वैद्य व नगरसेवक सुशील खेडकर यांचा समावेश आहे.

मार्च 2004 मध्ये एसएफ एस हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावरील स्ट्राँग रूममधून दहावीची प्रश्नपत्रिका चोरीस गेली होती. घटनेची चौकशी करण्यास विलंब झाल्याने भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी एसएफएस हायस्कूलवर मोर्चा काढला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शिक्षण मंडळाचे विभागीय सचिव बटेसिंग वसावे 3 मार्च 2004 रोजी शाळेत आले होते. त्यांना भारतीय विद्यार्थी सेनेच्या कार्यकर्त्यांनी रोखून पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करा, दोषींवर कारवाई करा आदी घोषणा देत सुशील खेडकर, रमेश इधाटे, राजू वैद्य, संजय जाधव, हिरालाल सलामपुरे आदींसह अनेकांनी वसावे यांच्या तोंडाला काळे फासले. सरकारी कामात अडथळा आणल्याची फिर्याद वसावे यांनी जवाहरनगर पोलिस ठाण्यात दिली होती. वसावे यांच्या फिर्यादीवरून विद्यार्थी सेनेच्या आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्यानंतर सहायक सरकारी वकील श्याम देशपांडे व संजय देशमुख यांनी चार साक्षीदार तपासले. त्यानंतर न्यायालयाने सेनेच्या पाच जणांना सहा महिन्यांच्या साध्या कैदेची शिक्षा सुनावली. आरोपींपैकी हर्षवर्धन सोहनी, हरीश मधुसूदन चावडा, प्रवीण अर्जुन जाधव यांची निदरेष मुक्तता करण्यात आली.