आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापौरांसह पदाधिकारी आज मातोश्रीवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महापौर त्र्यंबक तुपे यांच्यासह शिवसेनेचे सर्व स्थानिक पदाधिकारी गुरुवारी सायंकाळी मातोश्रीवर दाखल होत आहेत. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी सर्व नगरसेवक मातोश्रीवर जातात, ही आता परंपराच झाली आहे. यंदा नगरसेवक लगेच जाऊ शकले नाहीत. आता सेनेचाच महापौर झाल्यानंतर महापौरांसोबत सर्व नगरसेवक गुरुवारी सकाळी मुंबईकडे रवाना होण्याच्या तयारीत होते. मात्र, अखेरच्या क्षणी फक्त महापौरांना निमंत्राित करण्यात आले. त्यांच्यासोबत पालकमंत्री रामदास कदम, खासदार चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे ही मंडळीही जाणार आहेत.
पुढे वाचा... सभापतिपदावर नितीन चित्ते यांची बोळवण?