आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बाराशेऐवजी शंभरची पावती देऊ ऱ्हायलो, दोनशे रुपये घेऊ ऱ्हायलो...’ पाहा- गैरव्यवहाराचा Video

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हवालदराने वाहनचालकाला दिलेली हीच ती पावती... - Divya Marathi
हवालदराने वाहनचालकाला दिलेली हीच ती पावती...
औरंगाबाद- सिल्लेखाना चौकात दुचाकी चालवणाऱ्या एका युवकाला वाहतूक पोलिसाने पकडले. हेल्मेट, लायसन्स आणि इतर कागदपत्रांची विचारणा केली. युवकाने कागदपत्रे सोबत नसल्याचे सांगताच तेथे उपस्थित पोलिस हवालदाराने वेगवेगळ्या कलमांची सरबत्ती लावली आणि १२०० रुपये दंड भरण्यास सांगितले. तडजोडीत हवालदाराने भन्नाट स्किम दिली पैसेही घेतले.
सर नेमके काय म्हणायचे, असा प्रश्न युवकाने विचारताच हवालदार उत्तरले, ‘शंभरची पावती देऊ ऱ्हायलो बाराशेएवजी अन् दोनशे रुपये घेऊ ऱ्हायलो,’ असे सांगितले. ही स्किम सर्वश्रुत आहे, पण अशा काही पोलिसांमुळे संपूर्ण पोलिस दल बदनाम होत आहे. चार दिवसांपूर्वीच्या या व्यवहाराचा व्हिडिओ ‘डीबी स्टार’च्या हाती लागला आहे. व्हिडिओमध्येही या "व्यवहाराचे' संभाषण स्पष्टपणे ऐकू येते.

वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी वारंवार धडक मोहिमा राबवल्या, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली आणि विक्रमी दंडही वसूल केला. मात्र, याच कारवाईची भीती दाखवत काही वाहतूक पोलिस गैरफायदा घेत आहेत. त्यामुळे शासनाच्या तिजोरीबरोबरच खासगी वसुली किती झाली, हा प्रश्नही निर्माण होतो. युवकाला या हवालदाराने कलम १२९/१७७ अन्वये हेल्मेट नसल्याचाच दंड आकारला. या युवकासारख्या अशा अनेक लोकांसोबत असे प्रकार होतात, पण पुरावे नसल्याने ते समोर येत नाहीत. तथापि, वाहनधारकाने एकाच वेळेस एकापेक्षा जास्त नियमांचे उल्लंघन केल्यास प्रत्येक नियमासाठी ठरवून दिलेला दंड एकत्रितपणे संबंधित वाहनचालकाकडून वसूल केला जाऊ शकतो. दंडाचा हा आकडा किती असावा, याला मर्यादा नसून नियमांनुसार तो ठरतो, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली.
आयुक्तांचापोलिसांवर वचक हवाय: पोलिसआयुक्त अमितेश कुमार यांनी औरंगाबादकरांवर चांगलाच वचक निर्माण केला आहे. मात्र, याचा गैरफायदा घेत अतिरिक्त दंड आणि कारवाई केल्याचे दाखवत काही पोलिसच नागरिकांची लूट करत आहेत आणि स्वत:चीच तिजोरी भरत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांवर वचक निर्माण करणारे आयुक्त आपल्याच शिलेदारांवर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरत आहेत की काय, असा प्रश्न निर्माण होतो.
विना लायसन्स ६००, विना परवाना व्यक्तीस वाहन चालवण्यास देणे ३००, अल्पवयीन वाहन चालक ३००, लायसन्स जवळ बाळगणे १००; नंबर प्लेट नसणे, अस्पष्ट असणे, फॅन्सी नंबर प्लेट १००, विमा नसलेले वाहन चालवणे, विना पासिंग दुचाकीस ३०० चारचाकीस एक हजार रुपये, वाहन चालवताना मोबाइलवर बोलणे १००, हेल्मेट नसणे १००, सीटबेल्ट लावणे १००, सिग्नल तोडणे १००, ट्रिपल सीट (दुचाकी) १००, नशेत वाहन चालवल्यास कोर्टात हजर केले जाते, हेडलाइट टेललाइट नसणे ३००, साइड मिरर नसणे १००; नाव, पत्ता, सही करण्यास नकार देणे २००, चुकीच्या मार्गाने ओव्हरटेक करणे १००, इंडिकेटर नसणे १००, वाहनात नोंदणीव्यतिरिक्त बदल करणे- ५००, वेगमर्यादेचे उल्लंघन ५००, लाइन कटिंग १००, परवान्याचे उल्लंघन केल्यास कोर्ट दंड ठरवते, मीटरपेक्षा जास्त भाडे आकारणे १००, प्रवासी घेण्यास नकार देणे १००, प्रवाशांची चोरटी वाहतूक २२००, नो पार्किंग १००, पीयूसी नसणे ५००, पोलिसांनी इशारा केल्यास थांबणे २०० रुपये.

कार्यालयात हजर झाल्यावर माहिती घेतो
सायंकाळीपोलिसमुख्यालयामध्ये हजर झाल्यानंतर या संदर्भात सविस्तर माहिती घेतो आणि संबंधित हवालदाराची चौकशी करतो. सी.डी. शेवगण, सहायकपोलिस आयुक्त (वाहतूक)
हवालदाराने पावती लिहिली, युवकाकडून २०० रुपये घेतले आणि शंभर रुपयांची पावती युवकाच्या हातात दिली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, घटनेचे फोटोज आणि Video....
बातम्या आणखी आहेत...