आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Corruption News In Marathi, Employment Guarantee Scheme, Divya Marathi

रोहयो कामासाठी शालेय विद्यार्थ्यांचे जॉब कार्ड बनवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद तालुक्यातील राजेराय टाकळी येथील रोहयो कामात गैरव्यवहार झाल्याचे चौकशीदरम्यान झाले उघड
राजेराय टाकळी येथे रोजगार हमी योजनेच्या कामासाठी नववी व दहावीत शिकणार्‍या विद्यार्थ्यांचे बोगस जॉब कार्ड बनवून ग्रामसेवकाने भ्रष्टाचार केल्याचे तहसील कार्यालयामार्फत झालेल्या चौकशीत उघड झाले आहे. तहसील कार्यालयाने संबंधित ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचे आदेश गटविकास अधिकार्‍यांना दिले आहेत.
तालुक्यातील राजेराय टाकळी परिसरात 2010 ते 2013 कालावधीत विविध विभागांमार्फत रोजगार हमी योजनेतून कोट्यवधींची कामे झाली आहेत; परंतु या कामांत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप टाकळी येथील मनोज कुचे यांच्यासह नागरिकांनी केला होता. या तक्रारींवरून तहसील कार्यालयाने एका पथकाची स्थापना करून रोहयो कामांची चौकशी केली. यामध्ये इयत्ता नववीतील विद्यार्थिनी गुड्डी राठोड व दहावीतील लखन चव्हाण या दोन विद्यार्थ्यांच्या नावाने जॉब कार्ड तयार केल्याचे उघड झाले. त्यामुळे संबंधित ग्रामसेवक तसेच रोजगार सेवक यांच्यावर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना कायदा 2005 अन्वये कार्यवाही करण्याचे आदेश तहसील कार्यालयामार्फत गटविकास अधिकार्‍यांना देण्यात आले. आदेशाची एक प्रत मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी रोहयो यांना देण्यात आली आहे.
राजेराय टाकळी, धामणगाव, वीरमगाव, कनकशीळ या ठिकाणी झालेल्या रोहयोच्या कामात मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असल्याने धामणगाव येथील काही युवकांनी हा भ्रष्टचार चव्हाट्यावर आणला होता; परंतु यावर थातूरमातूर कार्यवाही करून हे प्रकरण दडपण्यात आले. परंतु टाकळी येथील ग्रामास्थांनीदेखील त्यांच्या गावात झालेल्या कामातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याचा निर्णय घेतला व त्यानुसार विविध ठिकाणी निवेदने देण्यास सुरुवात केली. त्यांनी तहसील कार्यालयाकडे दाद मागितली होती. अखेर त्यांना न्याय मिळाला.
अन्यथा न्यायालयात धाव
4रोहयोच्या कामात भ्रष्टाचार करणार्‍या अधिकार्‍यांवर व कर्मचार्‍यांवर ठोस कारवाई करण्याविषयी अनेक तक्रारी दिल्या आहेत; परंतु भ्रष्ट अधिकार्‍यांना वाचवण्याचा प्रयत्न तालुक्यातील अधिकारी करत आहेत. त्यांची चौकशी वरिष्ठ अधिकार्‍यांमार्फत होऊन भ्रष्टाचार करणार्‍या ग्रामसेवकावर पोलिस कारवाई करावी, अन्यथा उच्च् न्यायालयात धाव घ्यावी लागेल. मनोज कुचे, तक्रारदार, राजेराय टाकळी
घोटाळा