औरंगाबाद- संस्थेचा नोंदणीपूर्व चौकशी अहवाल सकारात्मक देण्यासाठी सहकारी संस्थाचालकाकडून 600 रुपयांची लाच घेणार्या उपनिबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी संजय विठ्ठलराव अब्दागिरे (44, रा. बी-2/11, कासलीवाल तारांगण, नाशिक रोड) याला एसीबीच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी 5.30 च्या सुमारास रंगेहाथ पकडले. त्याच्याविरुद्ध क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
भावसिंगपुरा, भीमनगरातील सचिन मोहन गवई (29) यांनी मोहन मागासवर्गीय औद्योगिक उत्पादन सहकारी संस्थेच्या नावनोंदणीसाठी फाइल सहकारी संस्था उपनिबंधक कार्यालयात दाखल केली. अब्दागिरेने गवईंकडे एक हजाराची मागणी केली, तेव्हा गवई यांनी 400 रुपये दिले. त्यानंतर त्यांनी एसीबीकडे तक्रार दिली. त्यावरून शनिवारी एसीबीचे उपअधीक्षक सुरेश वानखेडे, रामनाथ चोपडे, सुधाकर मोहिते, विक्रम देशमुख, अजय आवले, शेख मतीन यांनी सापळा रचत निराला बाजारातील हॉटेल कोहिनूर प्लाझाजवळ अब्दागिरेला अटक केली.