आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कापूस विक्रीची तूर्त घाई नकाे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ऑक्टोबर अखेरपर्यंत जिनिंगवर कापूस खरेदीला सुरुवात होते; पण गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही खरेदीसाठी नोव्हेंबरचा पहिला पंधरवडा उजाडणार आहे. राज्य आणि परराज्यातील खासगी खरेदीदारांनी मात्र दसऱ्याच्या मुहूर्तावर गावागावांत जाऊन कापूस खरेदीला सुरुवात केली. कापसाची प्रतिक्विंटल ५,५०० दराने खरेदी व बुकिंग होत आहे. हमी भावापेक्षा १३४० रुपये जास्त मिळत असले तरी गतवर्षीच्या तुलनेत यंदा ४ लाख क्विंटल गाठींच्या उत्पादनात घट होईल. त्यामुळे ८ हजार विक्रमी भाव मिळण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी कापूस विक्रीची घाई करू नये, असा सल्ला कृषितज्ज्ञांनी दिला.
राज्यात सर्वाधिक कापसाचे उत्पादन घेतले जाते. कोरडवाहू शेतीत बोंड फुटून कापूस घरात यायला सुरुवात झाली आहे. पीक कर्जाची परतफेड, आजारपण, दसरा, दिवाळीच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांनी कापूस विक्री करण्यास सुरुवात केली. ही बाब लक्षात घेत सरकारचे कापूस खरेदी केंद्र ऑक्टोबरमध्ये सुरू होणे आवश्यक होते; पण त्याला नोव्हेंबरपर्यंत उशीर होईल, असे महासंघातर्फे सांगितले जात आहे. याचा फायदा करून घेण्यासाठी खासगी व्यापाऱ्यांनी कापूस खरेदीला सुरुवात केली. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होईल, असे तज्ज्ञ सांगतात.
गतवर्षी ३८ लाख २५ हजार २०० हेक्टरवर प्रत्यक्ष कापसाची लागवड झाली होती आणि ७५ लाख क्विंटल गाठीचे उत्पादन झाले. त्या तुलनेत यंदा ३८ लाख ६ हजार ६०० हेक्टरवर म्हणजे ९२ टक्के कपाशी लागवड झाली. ७१ लाख क्विंटल कपाशीच्या गाठीचे उत्पादन अपेक्षित आहे. यात चार लाख क्विंटल गाठीच्या उत्पादन घटण्याची शक्यता आहे.
मराठवाडा कपाशीचे आगार
औरंगाबाद विभागाचे एकूण सरासरी क्षेत्र १० लाख १५ हजार १०० हेक्टर आहे. त्यापैकी ९ लाख ९४ हजार ८०० हेक्टरवर म्हणजेच ९४ टक्के, तर लातूर विभागाचे सरासरी क्षेत्र ७ लाख २ हजार ६०० हेक्टर असून ४ लाख ९४ हजार ९०० हेक्टरवर म्हणजे ७० टक्के कपाशीची लागवड झाली आहे. राज्यातील पेरणीचा विचार करता मराठवाडा कापूस उत्पादनाचे आगार असल्याचे दिसते.

पणन विभाग, मार्केट बंद करावेत
Ãसरकारने मध्यम धाग्याचा कापूस ३,८६० व लांब धाग्याला ४,१६० रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला; पण खरेदी सुरू झालेली नाही. व्यापाऱ्यांनी ५,५०० ते ६ हजार रु. प्रति क्विंटलने खरेदीला सुरुवात केली. म्हणजेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कपाशीला ७ हजार रुपये भाव मिळत असावा. सरकारने पणन, मार्केट बंद करावेत, म्हणजे स्पर्धा वाढून कपाशीला ८ हजारांवर भाव मिळेल.
- बुधाजीराव मुळीक, कृषी अर्थतज्ज्ञ, पुणे.
बातम्या आणखी आहेत...