आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वीकृत नगरसेवक निवडीची प्रक्रिया सुरू, बुधवारपासून अतिरिक्त आयुक्तांकडे अर्ज उपलब्ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालिकानिवडणूक संपल्यानंतर अनेकांनी स्वीकृत नगरसेवक होण्याचे वेध लागले आहे. पालिकेत जण स्वीकृत नगरसेवक म्हणून पुढील पाच वर्षे काम करू शकतील. त्यासाठी येत्या १३ ते १८ मे कालावधीत अतिरिक्त आयुक्तांकडे अर्ज उपलब्ध असणार आहेत. १९ २० मे रोजी अर्ज सादर केले जाऊ शकतील. त्यानंतर २१ मे रोजी आयुक्त अर्जांची छाननी करतील. कोणत्या पक्षाच्या कोट्यातून कोण आला आहे, संबंधित निकषात बसतो का, हे स्पष्ट झाल्यानंतर आयुक्त स्वीकृत नगरसेवकांची घोषणा करतील.
स्वीकृत नगसेवक निवडीची प्रक्रिया कधी एकदाची सुरू होते, याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. या पदासाठी निकषात बसणाऱ्यांनी आयुक्तांकडे अर्ज करावा आणि आयुक्तांनी त्यावर निर्णय घ्यावा, अशी प्रक्रिया आहे. आज ही प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय झाला. बुधवारपासून अर्ज उपलब्ध होणार आहेत. अनेक इच्छुकांनी सर्व तयारी करून ठेवली असून अर्ज कधी मिळतात, त्याकडे त्यांचे लक्ष लागले होते. स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी कोण इच्छुक आहे, हे बुधवारपासून समोर येईल.
स्वीकृत नगरसेवकाला मतदानाचा अधिकार वगळता अन्य सर्व अधिकार लोकांतून निवडून गेलेल्या नगरसेवकाप्रमाणेच आहेत. त्याचबरोबर पालिका वर्तुळात सर्वत्र वावर असल्याने अनेकांनी आतापासूनच स्वीकृत नगरसेवक होण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आतापर्यंत राजकीय सोय म्हणून स्वीकृत नगरसेवकपद दिले जात होते; परंतु या वेळी शासनाने काही निकष दिल्याने माजी नगरसेवक, माजी महापौरांना पुन्हा मागील मार्गाने पालिका सभागृहात जाता येणार नाही. तरीही शासनाच्या निकषात बसून असे करता येते का, याची चाचपणी सुरू असल्याचे समजते.
पक्षनिहाय कोटा असा
{शिवसेना: 2, भाजप: 1, एमआयएम: 1
काँग्रेस-राष्ट्रवादी अपक्ष मिळून: 1
असे आहेत निकष
मान्यता प्राप्त नोंदणीकृत वैद्यक व्यावसायिक म्हणून किमान पाच वर्षांचा अनुभव, शिक्षणतज्ज्ञ म्हणून पाच वर्षांचा अनुभव. निवृत्त प्राध्यापक, व्याख्याता, मुख्याध्यापक {सनदी लेखापाल म्हणून पाच वर्षांचा अनुभव) (पाच वर्षांचा अनुभव असलेला अभियांत्रिकी पदवीधारक) (पाच वर्षांचा अनुभव असलेला अभिवक्ता किंवा राज्यात वर्षे विधी क्षेत्राचा अनुभव असलेली व्यक्ती.) (नगर परिषदेचा मुख्याधिकारी किंवा पालिकेचा सहायक आयुक्त, उपायुक्त म्हणून पाच वर्षांचा अनुभव) (नोंदणीकृत अशासकीय समाजधिष्ठित संस्थेत पाच वर्षे काम केल्याचा अनुभव.)