आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरसेवक म्हणतात, अाम्ही पत्र दिले, विनंती केली; वाट पाहा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- स्मार्टसिटीकडे निघालेल्या औरंगाबाद शहरात सध्या लोकांचे रस्त्यावरून वाहन चालवणे खड्ड्यांत जात आहे. प्रचंड वर्दळ असलेल्या द्वारकादास श्यामकुमार वस्त्र दालन ते बळीराम पाटील हायस्कूलपर्यंतच्या रस्त्याची बिकट अवस्था झाली अाहे. या रस्त्याच्या दुरुस्ती, डागडुजीची जबाबदारी असलेल्या नगरसेवकांना त्याबद्दल दु:ख वाटत असले तरी नेमके काम कसे करायचे हेच त्यांना माहिती नसल्याचे समोर आले आहे. एका नगरसेवकाने बजेटमध्ये तरतुदीचे पत्र दिल्याचे सांगितले, तर दुसऱ्याने आमदारांना पत्र दिल्याचे म्हटले. तिसऱ्याने पॅचवर्कसाठी लाख खर्च करणार असल्याची माहिती दिली.
कॅनॉट गार्डन ते टीव्ही सेंटर परिसरात राहणाऱ्या हजारो नागरिकांसाठी हा सुमारे एक किलोमीटर लांबीचा रस्ता म्हणजे जीवनवाहिनी आहे. मात्र, तो खड्ड्यांत गेल्याने वाहनचालकांना आझाद चौक ते टीव्ही सेंटर अथवा वोखार्ड ते टीव्ही सेंटर, जळगाव टी पॉइंट मार्गाने जावे लागत आहे. परंतु, किमान ३० ते ४० हजार लोकांना चिश्तिया चौक ते बळीराम पाटील हायस्कूल शाळा रस्त्याशिवाय पर्याय नाही. पाच नगरसेवकांच्या हद्दीत येणाऱ्या या रस्त्याच्या दुतर्फा तीन रुग्णालये, एक धार्मिक कार्यालय, चिकित्सालय, दोन गॅस एजन्सी, दोन बँका, मोठी पुस्तकांची दुकाने, चार हॉटेल, मनपाचा दवाखाना आहे. शिवाय सिडको नाट्यगृहासाठी याच रस्त्यावरून जावे लागते. त्यामुळे पहाटे पाच ते रात्री अडीच- तीन वाजेपर्यंत वर्दळ असते.

गेल्यावर्षीचझाला होता रस्ता: बळीरामपाटील ते बजरंग चौकातील स्वामिनी पोळी- भाजी केंद्रापर्यंत गेल्यावर्षी १५ लाख रुपये खर्चून डांबरीकरण करण्यात आले होते. ते पावसात वाहून गेेले. याबद्दल ठेकेदार, अभियंत्याची चौकशी झालेली नाही.
कुठे आहेत जीवघेणे खड्डे

द्वारकादास श्यामकुमार वस्त्र दालनासमोर, चिश्तिया पोलिस चौकीसमोर {राजलक्ष्मी कलेक्शन अरुण इलेक्ट्रिकल्ससमोर {एसबीआय बँकेच्या शाखा कार्यालयापासून बजरंग चौकाकडे येतानाचा खड्डा चुकवणेच शक्य नाही.

बजरंग चौक
चिश्तिया चौक
आविष्कार चौक
महापालिका लक्ष देत नाही, म्हणून थेट आमदार अतुल सावेंना साकडे घातले आहे. त्यामुळे लवकरच काम होणार आहे. मकरंदकुलकर्णी, गणेशनगर
आमदारांना सांगितले

यापेक्षा काय करणार?
मनपालासांगूनही रस्ता दुरुस्त झाला नाही. मी पाठपुराव्यापेक्षा जास्त काय करणार? आता स्वखर्चाने काम करण्याचा विचार आहे. अब्दुलनाईकवाडी, अाविष्कारकॉलनी

दोनदिवसांत डागडुजी
पॅचवर्कचीतयारी प्रशासनाने केली आहे. दोन दिवसांत काम होईल. काही प्रमाणात खड्डे बुजतील. शिवाजीदांडगे, गुलमोहरकॉलनी

दुरुस्तीसाठी पत्र दिले
रस्त्याचीदुरुस्ती किंवा नूतनीकरण करावे, असे पत्र मी नुकतेच स्थायी समिती सभापती दिलीप थोरात यांना दिले आहे. राखीप्रशांत देसरडा, सुराणानगर

पाचलाखांची तरतूद
विसर्जनाचीमिरवणूक लक्षात घेऊन तात्पुरत्या पॅचवर्कचा प्रयत्न आहे. त्यासाठी लाख रुपयांची तरतूद केली आहे. शीतलवीरभद्र गादगे, एन