आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचक-पुस्तक अभियान: देशातील पहिले स्मार्ट खेडे बाबांनी वसवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खड्ड्यांचे शहर- आज देशभरात डिजिटल इंडिया, स्मार्ट व्हिलेजची चर्चा होत आहे. मात्र भारताचे पहिले स्मार्ट खेडे बाबांनी वसवले. कुठल्याही ओळखपत्रांचा आधार घेता, आईच्या मायेने आनंदवनाचे संगोपन केले. माणूस पुरस्काराने मोठा होत नाही. बाबांनी त्यांच्या जीवनात अनेक भूमिका यशस्वीरीत्या पार पाडल्या, असे प्रतिपादन बाबा आमटे यांचे सुपुत्र डॉ. विकास आमटे यांनी केले.

शनिवारी गोविंदभाई श्रॉफ कला अकादमी सभागृहात राजहंस प्रकाशन आणि समकालीन प्रकाशनच्या वतीने वाचक-पुस्तक अभियानाची सुरुवात करण्यात आली. या वेळी “आनंदवन : आज आणि उद्या’ या विषयावर डॉ. आमटे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर होते. व्यासपीठावर कौस्तुभ आमटे, डॉ. सदानंद बोरसे, आनंद अवधानी, श्याम देशपांडे यांची उपस्थिती होती. डॉ. आमटे म्हणाले, आनंदवन ही प्रयोगशाळा आहे. येथील कुष्ठरोग्यांना मतदानाचा हक्क नाही. त्यामुळे एकही नेता येथे आला नाही. अशा स्थितीत आनंदवनाला आतापर्यंत सांभाळले. उद्याचे आनंदवन हे एलपीजीविरहित असेल. भारतातील हे पहिले स्मार्ट खेडे आहे. त्यास व्हिजन आहे. अनेक जण पैशाच्या बळावर सीएसआरची कामे केल्याचे दाखवतात. मात्र आम्ही तनमनधनाने सीएसआर आहोत. सरकारचा कोणताही सहभाग नसलेले झीरो खेडे आज स्मार्ट व्हिलेज म्हणून आनंदवन पुढे येत आहे. आमच्या कामाची आता कुठे सुरुवात होत आहे. जगातील नकाशावर एकमेव एनजीओ आनंदवन आहे. साईबाबांच्या मंदिरात लाडू बनतात. परंतु आनंदवनात आम्ही अनेक गोष्टी बनवतो. लोकांची मानसिकता आणि सवय बदलण्याची आज खरी गरज आहे असेही डॉ. आमटे म्हणाले. अध्यक्षीय समारोप चपळगावकर यांनी केला. नवनवे प्रयोग राबवत नवे आयाम आनंदवनाने निर्माण केल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक डॉ. सदानंद बोरसे यांनी केले. आनंद अवधानी यांनी उपक्रमामागची भूमिका स्पष्ट केली. अॅड. गीता देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले.

दिव्यांग मुलांसाठी शाळा
कौस्तुभ आमटे यांनी आनंदवनाचा ६७ वर्षांचा प्रवास पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे उलगडला. आनंदवनात शाळा, कॉलेज, दिव्यांग मुलांसाठी विशेष शाळा आहे. येथे सुरू असलेले उपक्रम, भविष्यातील कार्यक्रम याची माहिती दिली.
बातम्या आणखी आहेत...