आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमविवाहाचे स्वप्न भंगल्याने युगुलाने घेतले विष; तरुणीचा मृत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- वर्षभरापूर्वी दोघांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. लग्नाच्या आणाभाका घेतल्या. मात्र, जात आड आली. मुलीच्या घरच्यांनी लग्नाला प्रखर विरोध केला. त्यामुळे दोघांनी आयुष्य संपवण्याचा कठोर निर्णय घेतला. बंद खोलीत दोघांनी विष प्राशन केले. बंद दरवाजामागे दोघे तडफडत होते. तरुणाचा रूममेट घरी आला तेव्हा हा हृदयद्रावक प्रकार समोर आला. तोपर्यंत तरुणीचे प्राण पाखरू उडाले होते. तरुणाला तात्काळ उपचारासाठी धूत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.

अशोक ढोणे (२४, रा. अंबाजोगाई ह.मु. ठाकरेनगर, एन-२) असे या तरुणाचे नाव असून अश्विनी हजारे (२४, रा.परतूर) असे मृत तरुणीचे नाव आहे. अशोक चिकलठाणा एमआयडीसीतील एका कंपनीत कनिष्ठ अधिकारी म्हणून काम करत होता. तर अश्विनीचे बीए, बीएडपर्यंत शिक्षण झाले होते. वर्षभरापूर्वी अशोकने सिडको येथे एमपीएससीच्या तयारीसाठी क्लास लावला होता. त्या ठिकाणी दोघांची ओळख झाली आणि त्यांचे प्रेम जुळले.
पुढील स्लाइड्सवर वाचा, कशी आहे अशोकची प्रकृती... जातीच्या भिंतीत प्रेम दफन
बातम्या आणखी आहेत...