आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाखा अभियंत्यास विहिरीत ढकलणाऱ्यास सक्तमजुरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आैरंगाबाद- अापलं पाणी प्रकल्प योजनेतील विहिरीचे काम पाहण्यासाठी आलेल्या शाखा अभियंत्यास विहिरीत ढकलणाऱ्या काळू थोरे यास अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांनी दोन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली.

पैठण तालुक्यातील घारेगाव येथे आपलं पाणी प्रकल्प योजनेअंतर्गत विहिरीचे काम पाहण्यााठी जि.प.चे संनियंत्रण तज्ज्ञ राहुल दिगंबर चौधरी, शाखा अभियंता प्रवीण देशपांडे कर्मचारी १५ मे २००८ रोजी गेले होते. या वेळी गावातील तेजराव ऊर्फ काळू बाबूराव थोरे याने पथकाला शिवीगाळ करीत देशपांडेंना विहिरीत ढकलले. गंभीर जखमी देशपांडेंना तातडीने घाटीत दाखल करण्यात आले. चौधरींच्या तक्रारीवरून पाचोड पोलिसांनी थोरेविरुद्ध गुन्हा दाखल केला. या प्रकरणाची अंतिम सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. नायर यांच्यासमोर झाली असता सहायक लोकअभियोक्ता सुदेश शिरसाठ यांनी पाच साक्षीदार तपासले. यामध्ये राहुल चौधरी, प्रवीण देशपांडे, डॉ. सुनंदा गायकवाड यांची साक्ष महत्त्वाची ठरली.
बातम्या आणखी आहेत...