आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धार्मिक स्थळे हटवण्यासंदर्भातील हस्तक्षेप अर्ज दाखल करून घेण्यास खंडपीठाचा नकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- अनधिकृत धार्मिक स्थळे हटवण्यासंदर्भातील सुमोटो याचिकेत हस्तक्षेप अर्ज दाखल करून घेण्यास हायकोर्टाने मंगळवारी नकार दिला. मात्र, प्रकरणात म्हणणे मांडण्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल करण्यास मुभा दिली आहे. 

महापालिकेने ११०५ अनधिकृत धार्मिक स्थळांची यादी तयार केली आहे. त्यानुसार शहरातील विविध भागांत कारवाई सुरू आहे. कारवाईच्या यादीत असलेल्या जय हनुमान सेवाभावी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष नीळकंठ निवृत्ती मुसाने यांनी सुमोटो याचिकेत हस्तक्षेप अर्ज सादर करण्यासाठी परवानगी मागितली होती. मंगळवारी झालेल्या सुनावणीत सदर अर्जाला न्यायालयाने परवानगी देण्यास नकार दिला. मात्र, याचिकाकर्त्यांना म्हणणे मांडण्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल करण्याची मुभा दिली.
बातम्या आणखी आहेत...