आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • CPI Candidate Dr. Balachandra Congo, Latest News

विकासातील विषमता दूर करण्यासाठी लढणार, पूर्वचे उमेदवार डॉ. भालचंद्र कांगो यांची स्पष्टोक्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- पूर्व मतदारसंघ तीन प्रकारांमध्ये विभागला गेला आहे. नियोजनबद्ध विकास झालेले सिडको शहर, मनपांतर्गतचा जुना परिसर आणि पायाभूत सुविधांपासून वंचित असलेला गुंठेवारीचा यात समावेश आहे. गुंठेवारीच्या १८५ वसाहतींमधील प्रश्न सरकारी हस्तक्षेपाअभावी निर्माण झाले असून हा प्रश्न मार्गी लावण्याचा निर्धार भाकपचे उमेदवार डॉ. भालचंद्र कांगो यांनी केला.
डॉ. कांगो यांनी शनिवारी (११ ऑक्टोबर) ह्यदिव्य मराठीह्ण कार्यालयाला सदिच्छा भेट देऊन संपादकीय सहकाऱ्यांशी चर्चा केली. त्या वेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली मते मांडली. ते म्हणाले, मराठवाड्याचा आणि पर्यायाने औरंगाबाद शहराचा विकास धर्मांध शक्तीमुळे खुंटला. प्रस्थापित राजकीय पक्षांचे नेते विकासाच्या द्द्याला पद्धतशीरपणे बगल देतात. त्यामुळे विकासाचा असमतोल निर्माण झाला असून विषमता वाढत आहे.
पूर्वचे विद्यमान आमदार राजेंद्र दर्डा यांनी केलेले शहर विकासाचे दावे फोल आहेत. विकासाचे श्रेय लाटण्याची त्यांना हौस असेल तर गुंठेवारीच्या बकालपणाचीही त्यांनी जबाबदारी स्वीकारावी, अशी उपरोधिक टीकाही डॉ. कांगो यांनी केली. आपण अनेक वर्षांपासून कामगार, श्रमिक, कष्टकरी, शोषित, पीडित, दलित, महिला आणि मोलकरणींसाठी काम करत आहोत. त्यामुळे प्रचारामध्ये सर्व क्षेत्रातून आपल्याला वाढता पाठिंबा मिळत आहे. नामांकन अर्जासोबत भरावयाची अनामत रक्कमही मोलकरणींच्या संघटनेने भरली आहे. शिवाय मतदारांकडेच आपण ह्यव्होट दो, अशा पद्धतीने आवाहन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

काय मांडले मुद्दे ?
1 खासगीकरणातून संतुलित विकास होतो व पारदर्शकपणे कामांचा दावा वारंवार केला जातो, मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे. मनपाने सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्थेसाठी कंत्राट दिले होते. त्यांनी मनपाकडून आगाऊ पैसे घेऊन बस खरेदी केल्या, मात्र ही व्यवस्था मोडकळीस आली.
2 सिद्धार्थ गार्डनमधील बीओटी तत्त्वावर खासगी कंत्राटदारांमार्फत शॉपिंग
प्लाझा देण्याचे ठरले होते.
मात्र, हा प्रयोगही फसला.
3 कचरा उचलण्याचे कंत्राट रॅम्कीकडे देऊन त्यांना कोट्यवधींचा लाभ दिला. मात्र, करारनाम्यातील ह्यशून्य कचराह्ण या संकल्पनेला हरताळ फासला गेला. कचरा तसाच पडून राहत असल्याने रॅम्कीनेही पळ काढला.