आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फटाका लडीचा आवाज 140 डेसिबलपेक्षा जास्त असेल तर बंदी, फटाक्यांची होणार चाचणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - प्रदूषण नियंत्रण मंडळ यंदा फटाक्यांचा आवाज प्रदूषणाविषयी चाचणी घेताना जास्त सजग राहणार आहे. मागच्या वर्षी फटका बाजाराला लागलेल्या आगीमुळे झालेले नुकसान हे त्यामागचे कारण आहे. सिंगल फटाका १०४, तर लड फोडली तर १४० डेसिबलची मर्यादा घालून दिली आहे. यापेक्षा जास्त आवाज आढळला तर त्या कंपनीच्या ब्रँडवर बंदी घातली जाणार आहे. 
 
5 ऑक्टोबर रोजी प्रदूषण नियंत्रण मंडळ फटाक्यांच्या आवाजाची चाचणी घेणार आहे. ही चाचणी चिकलठाणा येथील झालानी टूल्सच्या मैदानावर होईल. बाजारातील सर्वच कंपन्यांच्या फटाक्यांचे नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घेतले आहेत. यात सुतळी बॉम्ब, लक्ष्मी बॉम्बसह तत्सम फटाके आणि सर्व प्रकारच्या लडींची चाचणी घेतली जाईल. सकाळी अकरा ते दुपारी चारपर्यंत ही चाचणी चालणार आहे. यात फटाक्यांचा आवाज प्रामुख्याने ब्रँड कंपनीनुसार नोंदवला जाईल. सिंगल फटाक्याचा आवाज १०४ डेसिबल, तर लडींचा आवाज १४० डेसिबलपर्यंत असायला हवा. यापुढे आवाज जाणाऱ्या कंपन्यांना नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे. 

आवाजासह वायू प्रदूषण मोजणार 
आवाजामुळे खूप प्रदूषण होते. त्याचीही चाचणी घेतली जाईल. शहरात चार भागांत आम्ही यंत्रे बसवली आहेत. औरंगपुरा, कलेक्टर ऑफिस, कडा ऑफिस येथे दररोज वायू प्रदूषण मोजले जाते. तेथे दिवाळीतील फटाक्यांमुळे होणारे वायू प्रदूषण मोजू. 
- जे. ए. कदम, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ 
बातम्या आणखी आहेत...