आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साताऱ्यातील म्हाडा कॉलनीत अघोषित कचरा डेपो तयार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या सातारा वॉर्डातील म्हाडा कॉलनीत गेल्या काही दिवसांपासून अघोषित कचरा डेपो तयार करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. महिनाभरापासून कचरा टाकण्याची अडचण असूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचे समोर आले आहे.
सातारा आणि देवळाई वॉर्डातील कचरा मनपाच्या स्थानिक कर्मचाऱ्यांकडून जमा करण्यात येतो. मात्र कचरा टाकण्याची अडचण असल्याने मिळेल त्या जागेवर कचरा टाकण्यात येत असल्याचे समोर आले. मनपाकडून या दोन्ही वॉर्डात कोणतीच मूलभूत सुविधा देण्यात येत नाही. केवळ कचरा उचलण्याचे काम करण्यात येत असल्याने काही प्रमाणात नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सातारा आणि देवळाई वॉर्डातून गोळा केलेला कचरा घेऊन जाण्यासाठी मनपाने पूर्वी खासगी ठेकेदाराला कंत्राट दिला होता. एका टिप्परच्या सहाय्याने दिवसातून दोन ट्रिपा करून वॉर्डातला कचरा नारेगावच्या डेपोत नेण्यात येत होता. मात्र करार संपल्याने वॉर्डातून कचरा बाहेर नेण्याची अडचण येत होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांकडून साताऱ्यातील स्मशानभूमीत कचरा टाकण्यात आला. नागरिकांनी विरोध केल्यामुळे कचरा गावाच्या बाहेर नेऊन टाकण्यात येत होता. मात्र देवळाईतील कचरा नेण्याची अडचण होत असल्याने दोन्ही वॉर्डांच्या मधोमध असलेल्या म्हाडा कॉलनीतील मोकळ्या जागेत कचरा टाकण्यात येत होता. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मनपाला हा कचरा घेऊन जावा लागणार आहे.

कायमस्वरूपी व्यवस्था करणार
^आतापर्यंत ठेकेदाराच्या साहाय्याने नारेगावात कचरा नेण्यात येत होता. आता मात्र तो एका ठिकाणी जमा करण्यात आला आहे. उद्यापासून कचरा नेण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तांत्रिक अडचणीमुळे कचरा उचलता आला नाही. तसेच येथील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात येणार आहे. -शिवाजी झनझन, घनकचरा प्रमुख

गाड्यांतून गोळा करण्यात येताे कचरा
सातारा आणि देवळाई या दोन्ही वाॅर्डांतील जमेल तेवढ्या नागरिकांच्या घरातून कचरा गोळा करण्याचे काम बारा जणांकडून करण्यात येेते. यात दाेन जवान, एक सुपरवायझर, आठ सफाई कामगार आहेत. साताऱ्यासाठी चार तर देवळाई वॉर्डात तीन गाड्यांमधून कचरा जमा करण्यात येतो. विशेष म्हणजे कर्मचारी कमी असूनही नियमित कचरा उचलण्याचे काम कर्मचाऱ्यांकडून करण्यात येते.
बातम्या आणखी आहेत...